Mumbai Indians : पर्स रिकामी, पण मुंबई इंडियन्स ऑक्शनमध्ये गेम करणार, 7 खेळाडूंची लिस्टच काढली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबरला पार पडणार आहे. या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सकडे सगळ्यात कमी पर्स आहे. लिलावामध्ये मुंबईला फक्त 2.75 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत.
advertisement
1/9

मुंबई इंडियन्सना 2.75 कोटी रुपयांच्या किंमतीमध्ये 5 खेळाडू विकत घ्यायचे आहेत, यात ते जास्तीत जास्त एका परदेशी खेळाडूंना विकत घ्यावं लागणार आहे.
advertisement
2/9
मुंबईकडे सध्या रेयान रिकलटन आणि रॉबिन मिन्झ हे दोन विकेट कीपर आहेत, पण रॉबिन मिन्झ याला फार अनुभव नाही. त्यामुळे तिसरा विकेट कीपर म्हणून मुंबई आर्यन जुयाल किंवा लुवनिथ सिसोदिया यांच्यातल्या एकावर बोली लावू शकते.
advertisement
3/9
आर्यन जुयालला लखनऊने लिलावाआधी रिलीज केलं, पण आर्यन मुंबई इंडियन्सच्या प्लानमध्ये फिट बसू शकतो. तरुण, तडफदार आणि आक्रमक बॅटिंग करणारा आर्यन जुयाल मुंबईसाठी दुसरा इशान किशन ठरू शकतो.
advertisement
4/9
आर्यन जुयालला विकत घेता आलं नाही तर मुंबईकडे लुवनिथ सिसोदियाचाही विचार करू शकते. हुबळी टायगर्सकडून खेळताना सिसोदियाने 146 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती.
advertisement
5/9
मुंबईने लिलावाआधी रीस टॉपली आणि लिझार्ड विलियम्स या दोन फास्ट बॉलरना रिलीज केलं आहे, त्यामुळे 7 ते 15 ओव्हरमध्ये मुंबई परदेशी फास्ट बॉलरला टार्गेट करू शकते, यात गेराल्ड कोटझी, एनरिक नॉर्किया, मॅट हेन्री, स्पेन्सर जॉनसन यांचा विचार करू शकते.
advertisement
6/9
रोहित आणि रेयान रिकलटन यांच्या ओपनिंगला पर्याय म्हणून मुंबईकडे पृथ्वी शॉचाही ऑप्शन आहे. पृथ्वी शॉला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव आहे, तसंच पृथ्वी पॉवर प्लेमध्ये धमाका करू शकतो.
advertisement
7/9
शेख रशीदने अंडर-19 क्रिकेटमध्ये भविष्याची चुणूक दाखवली आहे. मुंबईचा युवा खेळाडूंना संधी द्यायचा इतिहास पाहता शेख रशीदही त्यांच्या रडारवर असू शकतो.
advertisement
8/9
दीपक चहरचा दुखापतींचा इतिहास पाहता सिमरजीत सिंग, आकाश मढवाल, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी हे भारतीय फास्ट बॉलरचे पर्यायही लिलावात उपलब्ध आहेत.
advertisement
9/9
आयपीएल लिलावाआधी मुंबईने दोन स्पिनरना सोडलं आहे, त्यामुळे राहुल चहर आणि कुमार कार्तिकेय हे दोन खेळाडूंचाही मुंबई विचार करू शकते. राहुल चहर आणि कुमार कार्तिकेय यांना मुंबईकडून खेळण्याचा अनुभवही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : पर्स रिकामी, पण मुंबई इंडियन्स ऑक्शनमध्ये गेम करणार, 7 खेळाडूंची लिस्टच काढली!