काव्या मारनला 30 लाखात 'हिरा' मिळाला, 13 सामन्यात तिसरी डबल सेंच्युरी, कोण आहे 22 वर्षांचा नवा सेन्सेशन?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सर्व 10 फ्रॅन्चायजींनी जाहीर केली. रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या ट्रेडच्या चर्चा बऱ्याच रंगल्या, पण या सगळ्यात सनरायझर्स हैदराबादने स्मार्ट रिटेनशन केलं आहे.
advertisement
1/7

सनरायझर्स हैदराबादने अशा खेळाडूला रिटेन केलं आहे ज्याने स्थानिक क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. विशेष म्हणजे हैदराबादने त्याच्यासाठी फक्त 30 लाख रुपये मोजले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातलं हे सगळ्यात अंडररेटेड रिटेनशन मानलं जात आहे.
advertisement
2/7
कर्नाटकच्या रविचंद्रन स्मरनने चंडीगडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात मोसमातील दुसरं आणि करिअरमधले तिसरे द्विशतक झळकावले आहे. रविचंद्रन स्मरन याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत फक्त 13 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत.
advertisement
3/7
रविचंद्रन स्मरनने चंडीगडविरुद्धच्या सामन्यात नाबाद 227 रन केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्मरनची सरासरी 76.8 ची आहे. 22 वर्षांच्या स्मरनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या 4 शतकांपैकी 3 शतकांचं द्विशतकांमध्ये रुपांतर केलं.
advertisement
4/7
चंडीगडविरुद्धच्या सामन्यात स्मरन पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता, तेव्हा कर्नाटकची अवस्था 64/3 अशी होती, पण यानंतर स्मरनने फॉर्ममध्ये असलेल्या करुण नायरसोबत 120 रनची पार्टनरशीप केली.
advertisement
5/7
या डबल सेंच्युरीमुळे स्मरनने रणजी मोसमात आतापर्यंत 227 नाबाद, 54, 4, 220 नाबाद, 3, 77 आणि 10 अशा रन केल्या आहेत. स्मरनने त्याचं मागची डबल सेंच्युरी केरळविरुद्ध मंगळपुरममध्ये केली होती. स्मरनची पहिली डबल सेंच्युरी 7 सामन्यांपूर्वी पंजाबविरुद्ध बंगळुरूमध्ये आली होती.
advertisement
6/7
स्मरनने दुलीप ट्रॉफीमध्ये साऊथ झोनचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर आता हा डावखुरा बॅटर इंडिया ए कडून खेळण्याची शक्यता आहे. लिस्ट ए मध्ये स्मरनची सरासरी 72.16 आहे तसंच त्याचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा जास्त आहे.
advertisement
7/7
आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादने स्मरनला बदली खेळाडू म्हणून विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. आयपीएल 2026 साठी सनरायझर्स हैदराबादने त्याला टीममध्ये कायम ठेवले आहे. या आयपीएलमध्ये स्मरन महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा सनरायझर्स हैदराबादला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये स्मरनची सरासरी 34 आणि स्ट्राइक रेट 170 चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
काव्या मारनला 30 लाखात 'हिरा' मिळाला, 13 सामन्यात तिसरी डबल सेंच्युरी, कोण आहे 22 वर्षांचा नवा सेन्सेशन?