TRENDING:

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात तिघांचा गेम केला, पराभव चेन्नईचा पण तडाखा RCB-मुंबईला!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी अर्धशतक ठोकत राजस्थानला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. वैभवच्या या तडाख्यामुळे सीएसकेचा तर पराभव झालाच पण मुंबई इंडियन्स आणि आरसीबीलाही धक्का बसला.
advertisement
1/7
वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात तिघांचा गेम केला, पराभव चेन्नईचा पण तडाखा RCB-मुंबईला!
आयपीएलच्या मागच्या मोसमात शेवटच्या क्रमांकावर राहणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सची यंदाच्या मोसमातली सुरूवातही निराशाजनक झाली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा दारूण पराभव झाला आहे.
advertisement
2/7
पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. 19.4 ओव्हरमध्येच चेन्नईचा 127 रनवर ऑलआऊट झाला. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जेमी ओव्हरटनने 43 रनची खेळी केली, त्यामुळे सीएसकेला 100 रनचा टप्पा पार करता आला.
advertisement
3/7
राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
advertisement
4/7
पहिले बॅटिंग करणाऱ्या चेन्नईला नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर यांनी सुरूवातीपासूनच धक्के दिले. पॉवर प्लेमध्येच चेन्नईच्या पहिल्या 4 विकेट पडल्या होत्या, त्यानंतर मात्र त्यांना कमबॅक करता आला नाही आणि 127 रनवर त्यांचा ऑलआऊट झाला.
advertisement
5/7
चेन्नईने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने अगदी सहज केला. वैभव सूर्यवंशीने वादळी अर्धशतक करत चेन्नईला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केलं. वैभवने 17 बॉलमध्ये 305.88 च्या स्ट्राईक रेटने 52 रन केल्या, यात त्याने 5 सिक्स आणि 4 फोर मारल्या.
advertisement
6/7
वैभव सूर्यवंशीशिवाय यशस्वी जयस्वालने नाबाद 38 रन केले आणि ध्रुव जुरेलने 18 तर कर्णधार रियान परागने नाबाद 14 रनची खेळी केली. चेन्नईकडून अंशुल कंबोजने 2 विकेट घेतल्या.
advertisement
7/7
वैभव सूर्यवंशीच्या या वादळी बॅटिंगचा तडाखा मुंबई आणि आरसीबीलाही बसला आहे. या विजयासोबतच राजस्थान रॉयल्सचा नेट रनरेट +4.171 एवढा झाला आहे, त्यामुळे राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी दुसऱ्या आणि मुंबई तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. आरसीबीचा नेट रनरेट +2.907 आणि मुंबईचा नेट रनरेट +0.687 आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात तिघांचा गेम केला, पराभव चेन्नईचा पण तडाखा RCB-मुंबईला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल