ना ऋतुराज ना शुभमन, कोण घेणार T20 World Cup मध्ये तिलक वर्माची जागा? मुंबईच्या स्टार खेळाडूचं नाव चर्चेत!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 World Cup 2026 Tilak Varma Replacement : अचानक पोटात दुखू लागल्याने तपासात 'टेस्टिकुलर टॉर्शन' झाल्याचे निष्पन्न झालं. तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर तिलक आता सावरत असला, तरी त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी किमान १ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके ठोकणारा स्टार फलंदाज तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेतून जवळपास बाहेर पडला आहे. राजकोट येथे विजय हजारे ट्रॉफी खेळत असताना त्याला अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या.
advertisement
2/6
अचानक पोटात दुखू लागल्याने तपासात 'टेस्टिकुलर टॉर्शन' झाल्याचे निष्पन्न झालं. तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर तिलक आता सावरत असला, तरी त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी किमान १ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
यामुळे ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप २०२६ मधील त्याच्या सहभागावरही टांगती तलवार आहे. तिलक वर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने ४० टी-20 मॅचमध्ये ११८३ रन्स केले आहेत.
advertisement
4/6
त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. जर तो वेळेत फिट झाला नाही, तर त्याच्या जागी वनडे कॅप्टन शुभमन गिल याची टी-20 संघात एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
5/6
पण बीसीसीआय वेगळाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीय शुभमन किंवा ऋतुराज गायकवाडला नाही तर श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये संधी देऊ शकते. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये देखील त्याला संधी दिली जाऊ शकते.
advertisement
6/6
दरम्यान, टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. बुधवारी त्याचे पुनर्वसन पूर्ण झाले आणि त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मधून डिस्चार्ज देण्यात आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ना ऋतुराज ना शुभमन, कोण घेणार T20 World Cup मध्ये तिलक वर्माची जागा? मुंबईच्या स्टार खेळाडूचं नाव चर्चेत!