Shreyas Iyer : पंजाब किंग्ज अडचणीत! सरपंच अय्यर IPL 2026 मधून 'आऊट' झाला तर कॅप्टन कोण? या पाच नावांची चर्चा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Next PBKS Captain IPL 2026 : पंजाब किंग्जचा सरपंच म्हणजे कॅप्टन श्रेयर अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. अशातच आता तो CSK विरूद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
1/7

मागील आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला फायनलपर्यंत पोहोचवणाऱ्या श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली आहे. पंजाबने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला. मात्र, पंजाबला यावेळी धक्का बसलाय.
advertisement
2/7
पहिल्याच सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यर याला दुखापत झाली असून तो आगामी CSK विरूद्धच्या सामन्यात किंवा उर्वरित संपूर्ण आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय. जर अय्यर नसेल तर कॅप्टन कोण?
advertisement
3/7
श्रेयस अय्यर जर उर्वरित आयपीएलमधून बाहेर झाला तर अर्शदीप सिंग हा सर्वोत्त पर्याय सध्या पंजाब किंग्जकडे आहे. टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट मानला जाणारा अर्शदीप टीम इंडियासाठी देखील खेळतो. तसेच त्याच्याकडे टीम लिडरशीप देखील आहे.
advertisement
4/7
पंजाब किंग्जकडे दुसरं सर्वात मोठं नाव म्हणजे शशांक सिंग. अपघाताने संघात आलेल्या या खेळाडूने पंजाबला अनेक सामने जिंकवलेत. खडतर परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता आहे. संघात सर्वांचा लाडका आहे. त्यामुळे पंजाब त्याच्यावर डाव लावू शकते.
advertisement
5/7
पंजाब किंग्जसाठी संकटमोचक ठरणारा स्टार ऑलराऊंडर मार्को यान्सेन देखील कॅप्टनशीपसाठी एक पर्याय आहे. मार्को यान्सन साऊथ अफ्रिकेचा व्हाईस कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
advertisement
6/7
स्टार सलामीवीर ओपनर आणि युवराजच्या तालमीतला पैलवान प्रभसिमरन सिंग याच्याकडे देखील भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहिलं जातंय. विकेटकीपर असणाऱ्या प्रभसिमरनने कॅप्टन्सीची कला आहे. त्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकते.
advertisement
7/7
एवढंच नाही, रिकी पॉटिंग हातावर हात ठेऊन बसणार नाही. रिकी पॉटिंगसमोर मार्कस स्टॉयनिस हा पर्याय देखील असेल. स्टॉयनिसने ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी केली आहे. त्यामुळे पंजाबसमोर हा देखील तगडा पर्याय असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : पंजाब किंग्ज अडचणीत! सरपंच अय्यर IPL 2026 मधून 'आऊट' झाला तर कॅप्टन कोण? या पाच नावांची चर्चा