Sanjay Manjrekar : टी-20 मालिका जिंकली पण संजय मांजरेकरांच्या मनात एक खंत कायम, म्हणाले, 'दीर्घकाळ स्मरणात राहिल...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanjay Manjrekar On Test Cricket : माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय क्रिकेटच्या सध्याच्या स्थितीवर एक महत्त्वाचे भाष्य केले असून, त्यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
advertisement
1/5

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असली, तरी संजय मांजरेकर यांच्या मते काही गोष्टी अजूनही टेस्ट क्रिकेट चाहत्यांच्या आणि जाणकारांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
2/5
संजय मांजरेकर म्हटलं आहे की, "कसोटी क्रिकेट आजच्या काळात कदाचित सर्वात लोकप्रिय फॉरमॅट नसेल, पण त्याचे निकाल दीर्घकाळ टिकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे आणि टी20 मालिका जिंकली असेल, पण कसोटी मालिकेतील 2-0 असा पराभव अजूनही मनाला खटकतोय."
advertisement
3/5
संजय मांजरेकर यांच्या मते, मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधील विजय महत्त्वाचे असले तरी, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटीत मिळालेल्या पराभवाचे सावट अद्याप कायम आहे, असं म्हणत मांजरेकरांनी गंभीरचे चिमटे काढले आहेत.
advertisement
4/5
आपल्या मताचं समर्थन करताना मांजरेकर यांनी कसोटी क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुढे नमूद केलं की, "कसोटी सामने हेच एखाद्या देशाच्या क्रिकेटची खरी स्थिती दर्शवतात, त्यामुळे त्याकडे लक्ष देणे हेच आजही प्राधान्य असले पाहिजे."
advertisement
5/5
दरम्यान, संजय मांजरेकर यांच्या या विधानामुळे टीम इंडियाने कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanjay Manjrekar : टी-20 मालिका जिंकली पण संजय मांजरेकरांच्या मनात एक खंत कायम, म्हणाले, 'दीर्घकाळ स्मरणात राहिल...'