टीम इंडियाची ताकद काय?
नेहमीप्रमाणे अभिषेक शर्मावर आक्रमक सुरूवात करण्याचं आवाहन असेल. अभिषेकच्या अटॅकमुळे टीम इंडियाला एक लय मिळू शकते. तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर स्पिनर्सला खेळू काढण्याचं काम असेल. शेवटी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना फिनिशिंगचा रोल कायम ठेवावा लागेल. तर स्पिनर डिपार्टमेंटमध्ये वरूण चक्रवर्ती मुख्य भूमिका निभावणार आहे. तर अर्शदीप आणि बुमराह विरोधी संघाचा खेळ खल्लास करतील.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या गट-ए मध्ये कोण?
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या गटात तगडे स्पर्धक नाहीत. संघाला गट-ए मध्ये पाकिस्तान, यूएसए, नामिबिया आणि नेदरलँड्ससोबत ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा अलीकडील विक्रमही मजबूत राहिला आहे. भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा हरवले आहे आणि याशिवाय एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित आहे.
ICC T20 WC 2026 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मावर मोठी जबाबदारी, जय शाहांची घोषणा
दरम्यान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, जिथे टीम इंडिया आपल्या पहिल्या मॅचमध्ये अमेरिकेचा (USA) सामना करेल. त्यानंतर, 12 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ दिल्लीत नामिबियाविरुद्ध मैदानात उतरेल. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित आणि हाय-व्होल्टेज मॅच, म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना टीम इंडिया 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.
