ICC T20 WC 2026 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मावर मोठी जबाबदारी, जय शाहांची घोषणा

Last Updated:

आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी मोठी घोषणा केली आहे.जय शाह यांनी आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मावर मोठी जबाबदारी दिली.

rohit sharma brand ambassador
rohit sharma brand ambassador
ICC T20 WC 2026 Rohit Sharma Brand Ambassador : आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची आज घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान रंगणार आहे.या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघाकडे संयुक्तरित्या देण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन्ही देशातील आठ स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच वेळापत्रक जाहीर होत असताना आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी मोठी घोषणा केली आहे.जय शाह यांनी आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मावर मोठी जबाबदारी दिली आहे.त्यामुळे रोहितच्या फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोलकत्तामध्ये आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्याचा कार्यक्रम सूरू आहे. या कार्यक्रमादरम्यान आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माची आयसीसी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.या घोषणेनंतर कार्यक्रमात बोलताता रोहित शर्माने जय शाह सह सगळ्यांचे आभार मानले आहे.क्रिकेट खेळत असताना कुणालाही आयसीसीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेले नाही, त्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आशा आहे आपण गेल्या वेळसारखं मॅजिक दाखवू,असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान रोहितने 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकून दिला होता, त्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.आता टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याला त्या फॉरमॅटचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहितच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
advertisement
कोणत्या गटात कोणता संघ 
गट अ : भारत,पाकिस्तान,अमेरिका,नेदरलँड्स,नामिबिया
गट ब : ऑस्ट्रेलिया,श्रीलंका,आयर्लंड,ओमान, झिम्बाब्वे
गट क : इंग्लंड,वेस्ट इंडिज,बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका,अफगाणिस्तान,कॅनडा,यूएई
भारताचे सामने कधी पार पडणार
भारत वि. युएसए : 7 फेब्रुवारी (मुंबई)
भारत वि. नामिबिया : 12 फेब्रुवारी (दिल्ली)
भारत वि.पाकिस्तान : 12 फेब्रुवारी (कोलंबो)
advertisement
भारत वि. नेदरलँड : 18 फेब्रुवारी (अहमदाबाद)
दोन्ही देशात कुठे सामने पार पडणार
भारत: मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई
श्रीलंका: आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (कोलंबो), पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (कँडी) आणि सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (कोलंबो)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC T20 WC 2026 : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मावर मोठी जबाबदारी, जय शाहांची घोषणा
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement