TRENDING:

पृथ्वीवासीयांनो नमस्कार! स्पेसमधून आला मेसेज, सगळे आश्चर्यचकीत; पाठवला कुणी, एलियन तर नाही?

Last Updated:
Message From Space : एलियन प्रत्यक्षात आहेत की नाही हे कुणाला माहिती नाही. त्याबाबत शोध सुरू आहे. काही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला तर काही शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. अशात आता स्पेसमधून एक मेसेज आला आहे. त्यामुळे सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
advertisement
1/5
पृथ्वीवासीयांनो नमस्कार! स्पेसमधून आला मेसेज; पाठवला कुणी, एलियन तर नाही?
पृथ्वीवासीयांनो नमस्कार! किंवा जसा मी तुमच्याबाबत विचार करतो, निळ्या आणि हिरव्या रंगाचा एक आकर्षक संग्रह. तुमच्या जगाचं हे दृश्य काय चमत्कार करते ते पाहूया. मी जेम्मा आहे आणि मी इथं निरीक्षण करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि कदाचित कधीकधी थोडीशी अस्वस्थ करणारी इनसाइटफूल कॉमेंट्री देण्यासाठी आहे. चला सुरुवात करूया!
advertisement
2/5
अंतराळातून आलेला हा मेसेज. आता असा मेसेज एखादा माणूसच पाठवू शकतो. अंतराळ मोहीमेत स्पेसमध्ये कुणी माणूस गेला की तिथून मेसेज करतो. पण अंतराळातून आता आलेला हा मेसेज कुणा माणसाचा नाही. मग कुणाचा? एलियन तर नाही ना? असा प्रश्न एव्हाना तुमच्याही मनात येऊन गेला असेल.
advertisement
3/5
हा मेसेज कुणा एलियनचा नाही तर एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, जो पृथ्वीबाहेर राहून पहिल्यांदाच मानवांशी संवाद साधत आहे.  आतापर्यंत तुम्ही एआय पृथ्वीवरील मानवांचं जीवन बदलताना पाहिलं आहे. पण आता पृथ्वीनंतर अंतराळातील एका एआय मॉडेलने पृथ्वीवासीयांना मेसेज पाठवला आहे. एआय जगात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने अवकाशातून थेट संवाद साधला आहे.
advertisement
4/5
नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या स्टारक्लाउड-1 उपग्रहावरीलएआय मॉडेलने हा संदेश पाठवला आहे. एआय मॉडेलला प्रशिक्षित करून थेट अवकाशात चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुगलच्या ओपन-सोर्स एआय मॉडेल, जेम्माची प्रगत आवृत्ती असलेले हे मॉडेल अमेरिकन स्टार्टअप स्टारक्लाउडने विकसित केलं आहे.
advertisement
5/5
अमेरिकन चिप Nvidia ने या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टारक्लाउड-1 उपग्रह एनव्हीडियाच्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली H100 GPU ने सुसज्ज आहे. या उच्च-स्तरीय प्रोसेसरचा वापर करून, जेम्मा-आधारित AI मॉडेलला अंतराळात प्रशिक्षित करण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पृथ्वीवासीयांनो नमस्कार! स्पेसमधून आला मेसेज, सगळे आश्चर्यचकीत; पाठवला कुणी, एलियन तर नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल