TRENDING:

'Rohit sharma वर अन्याय करू नका, कॅप्टन म्हणून...', जिगरी मित्रासाठी धावला Shikhar dhawan, म्हणतो...

Last Updated:
Shikhar dhawan on Rohit sharma : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका टीम इंडियाने गमावली आहे. पहिल्या दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे सध्या रोहित शर्मा जोरदार ट्रोल होताना दिसतोय.
advertisement
1/7
'रोहितवर अन्याय करू नका, कॅप्टन म्हणून...', जिगरी मित्रासाठी धावला शिखर धवन
रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. तर दुसरीकडे कॅप्टन म्हणून रोहित शर्माच्या नावावर नकोसा रेकॉर्ड लिहिला गेलाय. त्यावरून रोहितवर टीका होत होती.अशातच आता त्याचा मित्र मदतीला धावला असून शिखर धवनने यावर मोठं वक्तवय केलंय.
advertisement
2/7
फार कमी खेळाडूंना टीम इंडियाचं नेतृत्वं करणं जमतं आणि त्यामधला एक रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा हा नेहमी दबाव कमी करण्याचा प्रयत्न करतो, असं शिखर धवन म्हणाला आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाला रोहित शर्मासारखा कर्णधार मिळणार नाही. प्रत्येक संघाची विजय पराभव होतच असते. त्यासाठी रोहितासारख्या कर्णधारावर अन्याय करू नये, असे मला वाटते, असं स्पष्ट मत शिखर धवनने व्यक्त केलंय.
advertisement
4/7
टीम इंडियाला रोहित शर्मासारखा खेळाडूंना समजून घेणारा कर्णधार मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माला जेवढा काळ नेतृत्व दिलं जातं, ते संघासाठी महत्वाचं असेल, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
advertisement
5/7
प्रत्येक संघावर खेळताना दबाव हा असतोच. टीम इंडियावर किती प्रेशर असतं, हे तुम्हाला बाहेरून जाणवणार नाही. प्रत्येक संघ विजयासाठी खेळत असतो. खेळ म्हटलं की विजय आणि पराभव आलाच, असं शिखरने म्हटलं आहे.
advertisement
6/7
खेळाचा आनंद घेत विजय मिळवणं आलं पाहिजे, मला वाटतं की रोहित शर्माला ही गोष्ट चांगली जमते. त्यामुळे तो महान कॅप्टन आहे. रोहित शर्मा हा एक चांगला लीडर आहे. तो संघातील सर्व खेळाडूंना महत्वं देतो, असंही शिखर धवन म्हणालाय.
advertisement
7/7
दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवन खुप चांगले मित्र आहेत. रोहित शर्माने शिखरला नेहमी मदत केली आहे. तर शिखर देखील नेहमी रोहितची पाठराखण करताना दिसतो. अशातच आता रोहित ट्रोल होत असताना शिखरने खंबीर साथ दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'Rohit sharma वर अन्याय करू नका, कॅप्टन म्हणून...', जिगरी मित्रासाठी धावला Shikhar dhawan, म्हणतो...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल