TRENDING:

IND vs SA : वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न भंग होणार? पराभवापेक्षा जास्त पाच गोष्टी इंडियाला बोचणार

Last Updated:
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 162 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 51 धावांनी जिंकला आहे.
advertisement
1/7
वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न भंग होणार? पराभवापेक्षा जास्त पाच गोष्टी इंडियाला बोचणा
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 162 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 51 धावांनी जिंकला आहे.
advertisement
2/7
साऊथ आफ्रिकेने हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाची हार झालीच आहे, त्याचसोबत भारताला ही पाच कारणे खूप बोचणार आहेत.
advertisement
3/7
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती. कारण टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर अभिषेक आणि शुभमन गिल झटपट बाद झाले होते. अभिषेक शर्माचा तर फॉर्म हरवला आहे. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव गेल्या अनेक सामन्यापासून धावांसाठी संघर्ष करतायत.
advertisement
4/7
त्यानंतर तिलक वर्माने अर्धशतकीय खेळी करून भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान त्याच्या जोडीला हार्दिक पांड्या होता. हार्दिकचा अनुभव पाहता त्याने हा सामना जिंकवणे अपेक्षित होते. पण या सामन्यात ना त्याची बॅट चालली ना बॉलिंग चालली.
advertisement
5/7
गौतम गंभीर टीम इंडियाच्या बॅटींग लाईनमध्ये कमालिचे बदल करतो आहे. आज तर त्याने अक्षर पटेलला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. त्यामुळे बॅटींग लाईनमधल्या सततच्या बदलामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत आहे.
advertisement
6/7
साऊथ आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली होती. त्याच्यासोबत डोनोवन फरेराने 30 धावांची खेळी केली.या बळावर साऊथ आफ्रिकेने 4 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या.
advertisement
7/7
भारताकडून वरूण चक्रवर्तीने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट काढली होती. तर अर्शदिप सिंह, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न भंग होणार? पराभवापेक्षा जास्त पाच गोष्टी इंडियाला बोचणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल