IND vs NZ : फायनल टॉसला सूर्याकडून मोठी चूक, 'हुकमी एक्क्या'ला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आज भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे.
advertisement
1/8

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्याला सूरूवात झाली आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नाही आहेत. आणि मायदेशात कोणत्याही टीमला टॉफी उचलण्याचा मान मिळाला नाही. हा मान आज भारताला मिळवण्याची संधी आहे.
advertisement
3/8
दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन सॅटनरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरणार आहे.
advertisement
4/8
हा टॉस पार पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ही घोषणा एकूण सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
advertisement
5/8
खरं तर फायनलसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होईल असे बोलले जात होते. अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्तीला संघाबाहेर करण्याचे सल्ले दिले गेले होते. पण सूर्याने कुणाचेच न एकला प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केला नाही आहे.
advertisement
6/8
विशेष म्हणजे जरी अभिषेकला संघात कायम ठेवलं असलं तरी वरूणच्या जागी कुलदीप यादवला खेळवले पाहिजे होतं, असे अनेक दिग्गजांचे मत होते. पण सूर्याने कुलदीपला संघात संधी न दिल्याने हुकमी एक्का प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. याचा टीम इंडियाला धक्का बसणार आहे.
advertisement
7/8
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
advertisement
8/8
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : फायनल टॉसला सूर्याकडून मोठी चूक, 'हुकमी एक्क्या'ला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं