TRENDING:

Pakistan : हातात 1 पॉईंट, इंग्लंडने धुतलं, तरीही पाकिस्तान सेमी फायनलला जाणार... काय आहे समीकरण?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 2 विकेटने पराभव केला आहे. याचसोबत इंग्लंडने सेमी फायनलचं तिकीट कनफर्म केलं आहे. इंग्लंड यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे.
advertisement
1/7
हातात 1 पॉईंट, इंग्लंडने धुतलं, तरी पाकिस्तान सेमी फायनलला जाणार! काय आहे समीकरण
पाकिस्तानने दिलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून केला. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रुकने 51 बॉलमध्ये 100 रनची वादळी खेळी केली, ज्यात 4 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता.
advertisement
2/7
इंग्लंडने सुपर-8 मध्ये आधी श्रीलंकेविरुद्धही विजय मिळवला आहे, तसंच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. या कारणांमुळे इंग्लंड 4 पॉईंट्सवरच सेमी फायनलला पोहोचली आहे.
advertisement
3/7
इंग्लंडच्या या विजयाने पाकिस्तानच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या स्वप्नांना धक्का दिला आहे, पण पाकिस्तानला अजूनही सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे, पण यासाठी त्यांना दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
4/7
सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा एकमेव सामना उरला आहे. हा सामना त्यांना 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल, पण विजय झाला तर त्यांच्या सेमी फायनलच्या आशा कायम राहतील.
advertisement
5/7
पाकिस्तानचं सेमी फायनलला पोहोचणं आता न्यूझीलंडच्या हातात आहे. न्यूझीलंडचे उरलेले दोन सामने श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. न्यूझीलंडने हे दोन्ही सामने गमावले आणि पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर न्यूझीलंडचे 1 पॉईंट आणि पाकिस्तानचे 3 पॉईंट होतील, या परिस्थितीमध्ये पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचेल.
advertisement
6/7
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला आणि न्यूझीलंडने त्यांच्या 2 पैकी एक सामना गमावला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे समसमान म्हणजेच 3-3 पॉईंट होतील, त्यामुळे पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात ज्यांचा नेट रनरेट चांगला असेल तरी टीम सेमी फायनलला क्वालिफाय होईल.
advertisement
7/7
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट मायनस 0.461 झाला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवला तर त्यांचा नेट रनरेट प्लमध्ये येईल, ज्यामुळे त्यांच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम राहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pakistan : हातात 1 पॉईंट, इंग्लंडने धुतलं, तरीही पाकिस्तान सेमी फायनलला जाणार... काय आहे समीकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल