T20 World Cup : पाकिस्तानच्या कॅप्टनचा टॉस जिंकूनही मूर्खपणा... आजच वर्ल्ड कपमधून बाहेर होणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा सामना इंग्लंडविरुद्ध होत आहे. श्रीलंकेच्या पल्लकेले स्टेडियमवर या दोन्ही टीम आमने-सामने आहेत.
advertisement
1/8

इंग्लंडने त्यांच्या सुपर-8 च्या सामन्यात श्रीलंकेवर 51 रननी दणदणीत विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट हा +2.550 एवढा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर इंग्लंड सेमी फायनलच्या आणखी जवळ जाईल.
advertisement
2/8
दुसरीकडे पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळाले. सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम राहायचं असेल तर पाकिस्तानला हा सामना जिंकावाच लागेल, अन्यथा श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकूनही त्यांचे जास्तीत जास्त 3 पॉईंट्स होतील.
advertisement
3/8
पाकिस्तानचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांना न्यूझीलंडच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. न्यूझीलंडचा श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध पराभव व्हावा, यासाठी पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल.
advertisement
4/8
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी ही खेळपट्टी चांगली वाटत आहे, त्यामुळे आम्ही मोठा स्कोअर करण्याचा प्रयत्न करू, असं आगा म्हणाला आहे.
advertisement
5/8
टॉसआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा याने टीमने टॉस जिंकून नंतर बॅटिंग केली पाहिजे, कारण रात्री ही खेळपट्टी बॅटिंगसाठी आणखी चांगली होईल, असं म्हटलं होतं, पण सलमान आघाने आपल्याच देशाच्या खेळाडूचंही ऐकलं नाही.
advertisement
6/8
या सामन्यात पाकिस्तानने त्यांच्या टीममध्ये फक्त एक बदल केला. फहीम अश्रफच्या जागी शाहिन आफ्रिदीचं पाकिस्तानच्या टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर इंग्लंडने त्यांच्या टीममध्ये कोणताच बदल केला नाही.
advertisement
7/8
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकिपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद
advertisement
8/8
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, उस्मान खान (विकेटकिपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, उस्मान तारिक
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तानच्या कॅप्टनचा टॉस जिंकूनही मूर्खपणा... आजच वर्ल्ड कपमधून बाहेर होणार?