WPL 2026 : स्मृती मानधनाच्या टीमने 79 बॉलमध्ये मॅच जिंकली, थरारक सामन्यात युपी उडवला धुव्वा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्युपीएलच्या आजच्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने अवघ्या 79 बॉलमध्येच सामना जिंकला आहे. या सामन्यात स्मृती मानधनानाने नाबाद अर्धशतकीय खेळी केली.
advertisement
1/6

डब्ल्युपीएलच्या आजच्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने अवघ्या 79 बॉलमध्येच सामना जिंकला आहे. या सामन्यात स्मृती मानधनानाने नाबाद अर्धशतकीय खेळी केली.
advertisement
2/6
युपीने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सूरूवात चांगली झाली होती. आरसीबीकडून ग्रेस हॅरीसने एकटीने 37 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली होती. या खेळीत तिने 2 षटकार आणि 13 चौकार लगावले होते.
advertisement
3/6
ग्रेस हॅरीस हा सामना जिंकवेल असे वाटत असताना ती बाद झाल्यानंतर जॉर्जिया वॉल मैदानात आली. त्यानंतर स्मृती मानधनाने स्ट्राईक घेईन अवघ्या 79 बॉलमध्येच 143 धावांचं लक्ष्य गाठत हा सामना 8 विकेटने जिंकला.
advertisement
4/6
स्मृती मानधनाने यावेळी 27 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या तिच्या खेळीमुळे आरसीबीने हा सामना जिंकला होता. युपीकडून शिखा पांडे आणि आशा शोभनाने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
5/6
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना युपी वॉरियर्सने 8 विकेट गमावून 143 धावा ठोकल्या होत्या. युपीकडून मेग लेनिंगने 41 तर दिप्ती शर्माने 55 धावांची खेळी केली होती.
advertisement
6/6
तर आरसीबीकडून नदीने डी क्लर्सन सर्वाधिक 4 विकेट तर ग्रेस हॅरीसने 2 आणि लोरेन बेल आणि श्रेयांका पाटीलने एक विकेट घेतली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : स्मृती मानधनाच्या टीमने 79 बॉलमध्ये मॅच जिंकली, थरारक सामन्यात युपी उडवला धुव्वा