WPL 2026 : महाराष्ट्राच्या पोरीने अख्खी मॅच फिरवली, स्मृती मानधनाला हारलेली मॅच जिंकून दिली,प्लेऑफमध्ये दणक्यात एंन्ट्री
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्युपीएलमध्ये आज रॉयल चँलेजर्स बंगळुरूने गुजरात जाएटसचा 60 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह आरसीबीने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे.
advertisement
1/7

डब्ल्युपीएलमध्ये आज रॉयल चँलेजर्स बंगळुरूने गुजरात जाएटसचा 61 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह आरसीबीने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे.
advertisement
2/7
या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जाएटसची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण बेथ मुनी 3 वर तर सोफी डिवाईन शुन्यावर बाद झाली होती. त्यानंतर कनिका अहूजा शून्यावर गेली.
advertisement
3/7
गुजरातचे झटपट तीन विकेट पडल्यावर अनुष्का शर्मा आणि अॅशले गार्डनरने डाव सावरला होता. त्यानंतर गार्डनर मैदानात काही काळ टीकून होती, पण दुसऱ्या बाजूने एकामागून एक विकेट पडत होती.
advertisement
4/7
अॅशले गार्डनरले एकटीने यावेळी 54 धावांची सर्वाधिक खेळी केली. या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता न आल्याने गुजरातचा डाव 117 वर 8 विकेट पर्यंत मजल मारू शकला. आणि त्यांचा 61 धावांनी पराभव झाला.
advertisement
5/7
आरसीबीच्या या विजयाची शिल्पकार गौतमी नाईक ठरली आहे. कारण आरसीबीच्या संघाची देखील अशीच अवस्था झाली.
advertisement
6/7
पण गौतमी नाईकने एकटीने झूंज देऊन सर्वाधिक 73 धावा केल्या. तिच्या याच धावांमुळे आरसीबी 178 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.
advertisement
7/7
गौतमी नाईकच्या याच वादळी खेळीमुळे आरसीबीला हा पाचवा विजय मिळवता आला आहे. तर गुजरातला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : महाराष्ट्राच्या पोरीने अख्खी मॅच फिरवली, स्मृती मानधनाला हारलेली मॅच जिंकून दिली,प्लेऑफमध्ये दणक्यात एंन्ट्री