TRENDING:

माळरानातला हिरा! मेंढरं राखून कोल्हापूरच्या बिरदेवाचा UPSC मध्ये डंका

Last Updated:
मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे UPSC परीक्षेत ५५१ वी रँक मिळवून कोल्हापूरचं नाव मोठं केलं. त्याच्या संघर्षाचं आणि मेहनतीचं कौतुक महाराष्ट्रभर होत आहे.
advertisement
1/7
माळरानातला हिरा! मेंढरं राखून कोल्हापूरच्या बिरदेवाचा UPSC मध्ये डंका
परिस्थिती अत्यंत गरिब, पण मनानं हार नाही मानली, आलेला दिवस कष्ट करुन आणि जिद्द उराशी बाळगून मेंढपाळाच्या पोरानं कोल्हापूरचं नाव मोठं केलं. UPSC परीक्षेत पास झाला अन् त्याच्या कष्टाचं चीज झालं. मेंढरं राखत राखत अभ्यास केला, ध्येय एकच होतं परिस्थितून बाहेर पडायचं अन् काहीतरी करायचं, त्यानं UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं.
advertisement
2/7
कोल्हापूरच्या मुरुगूड, कागल तालुक्यातून उन्हाने तावलेली जमिन, डोक्यावर आभाळ नसलेलं घर, आणि खडतर परिस्थितीतली एक वाट, या साऱ्यावरून चालत एक मेंढरे राखणारा मुलगा एक दिवस यूपीएससीच्या निकालाच्या यादीत झळकला! हा मुलगा म्हणजे यमे गावातील बिरदेव डोणे.
advertisement
3/7
बिरदेव लहान असताना, त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बिरदेवला शिक्षणासाठी मिळेल ते काम करावे लागले. लहान वयातच त्याने मेंढरे चारण्याचे काम केले. त्यातून वेळ काढून तो अभ्यास करायचा. त्याच्या या यशाचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करत आहे.
advertisement
4/7
बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने UPSC परीक्षेत मिळवलेलं यश हे खऱ्या अर्थाने डोळे दिपवणारं असं नेत्रदीपक आहे. आज मेंढरं राखणारा बिरदेव उद्या अधिकारी म्हणून इतरांसोबतच याच मेंढपाळ बांधवांसाठीही पॉलिसी आखणार आहे.. त्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा म्हणत रोहित पवार यांनी बिरदेवला शुभेच्छा दिल्या.
advertisement
5/7
कागल तालुक्यातील यमगे गावाचा मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने यशाचा इतिहास घडवला आहे! केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून बिरदेवने संघर्ष, चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
advertisement
6/7
मेंढरामागं फिरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास दिल्लीच्यादरबारापर्यंत पोहोचलेला आहे. बिरदेव डोणे यांचं मन:पूर्वक अभिनंदन! तुझं यश प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
7/7
बिरदेवचा संघर्ष फक्त UPSC करणारेच नाहीत तर ज्यांना छोट्या अडचणी येतात आणि खचून जातात अशा प्रत्येक युवा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
माळरानातला हिरा! मेंढरं राखून कोल्हापूरच्या बिरदेवाचा UPSC मध्ये डंका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल