Success Story: हात नाहीत म्हणून काय झालं? हार्मोनियम वादक ते BMC अधिकारी माऊलीची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Success Story: माऊली अडकुर हिने हात नसतानाही पायाने हार्मोनियम वाजवून, प्रत्येकाला प्रेरणा दिली आहे. आपल्याकडे काय नाही यापेक्षा कोणती कला आहे आणि काय करु शकतो हे तिने संपूर्ण जगाला दाखवून दिलं.
advertisement
1/6

जिने लोक हार मानतात तिथे पायाने हार्मोनियम वाजवून इतिहास रचला आहे. आपण प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी रडतो, मात्र या तरुणी करुन दाखवलं, हात नसतानाही कला, अभ्यास आणि इतकंच नाही तर इतर क्षेत्रातही तितकीच पारंगत आहे. हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
advertisement
2/6
स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी साधनांची नाही तर लक्ष्य, ध्येय आणि ते पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते ते या तरुणीनं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं. महाराष्ट्रातल्या माऊली अडकुर या तरुणाला जन्मापासून दोन्ही हात नाही. मात्र ती यामुळे रडत बसली नाही. तर तिने लढण्याचा मार्ग निवडला.
advertisement
3/6
तिने आपल्या जिद्दीनं यावर मात करण्याचा निर्णय घेतला. आज ती उत्तम हार्मोनियम वाजवते. उत्कृष्ट जेवण करते इतकच नाही तर ती आज अधिकारी पदावर कार्यरत देखील आहे. हे सगळं स्वत:तिने करुन दाखवलं आहे. तिने दोन्ही पायांच्या मदतीनं हे यश संपादित केलं.
advertisement
4/6
जिथे सगळं शरीर धडधाकट असून रोजचा संघर्ष आपल्याला मोठा वाटतो. तिथे माऊलीला तर जन्मापासून दोन हात नाहीत हे स्वीकारुन तिने जिद्दीनं लढायचं ठरवलं. तिने 75 टक्के गुणांसह 2011 रोजी पॉलिटेक्निकल कम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला. इतकंच नाही तर मानसशास्त्रातून एम ए केलं.
advertisement
5/6
कलेची आवड असल्याने ती हार्मोनियम वाजवायला शिकली. आज उत्तम हार्मोनियम वाजवून ती आपली कलाही सादर करते. पायाने लिहायला शिकली, आई वडिलांना पावला पावलावर अनेक संकटांचा सामना करावा लागला, मात्र माऊलीसाठी जगण्याचा संघर्ष करण्याचा निश्चिय अधिक पक्का होत गेला.
advertisement
6/6
माऊलीने MPSC ची परीक्षा देखील दिली. तिने BMC ची परीक्षा पास करुन तिथे नोकरीही मिळवली आहे. आज ती सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून काम करते. तीची ही संघर्ष कथा प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: हात नाहीत म्हणून काय झालं? हार्मोनियम वादक ते BMC अधिकारी माऊलीची प्रेरणादायी कहाणी