Success Story: 'गावाहून आलाय' म्हणून हिणवलं, अपमान गिळला; आज त्याच सौरभ पांडे यांनी LV आणि Gucci सोबत केलं काम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सौरभ पांडे यांनी मुंबईत संघर्ष करून LV, Prada, Gucci, Diorसारख्या ब्रँड्ससोबत काम केले आणि लाखो फॉलोअर्स मिळवत स्वतःला स्वीकारण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
advertisement
1/10

आयुष्यात मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी समाजाच्या साचेबद्ध अपेक्षा झुगारून देणे, हे खूप कमी लोकांना जमतं. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून मुंबईत आलेल्या सौरभ पांडे यांची कहाणी अशाच जिद्दीची आणि आत्मविश्वासाची स्वत:ला स्वीकारण्याची आहे, जग काय म्हणेल यापेक्षा मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणणाऱ्या या सौरभजे आज जगभरातून लाखो फॉलोअर्स आहेत.
advertisement
2/10
जिथे टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाने LV आणि Prada सारख्या जागतिक ब्रँड्ससोबत काम करण्याचा मान मिळवला. सौरभ पांडे यांचे वडील मुंबईत टॅक्सी चालवत होते. युपीमधील एका छोट्या गावात तीन भावंडांसोबत लहानाचा मोठा झालेल्या सौरभ यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं अशी कुटुंबियांची इच्छा होती.
advertisement
3/10
मात्र, त्यांचे मन शेवटपर्यंत ही गोष्ट स्वीकारायला तयार झाले नाही. त्यांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे फॅशन डिझायनिंग! याच स्वप्नाच्या ओढीने त्यांनी मुंबई गाठली.मुंबईत वडिलांसोबत चाळीतील एका लहानशा घरात राहून त्यांनी आपल्या संघर्षाची सुरुवात केली.
advertisement
4/10
फॅशन क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी त्यांनी एका मॉलमध्ये १२-१२ तास उभे राहून नोकरी केली. फॅशनच्या जगात त्यांचा प्रवास सोपा नव्हता. "गावाकडून आलाय" असे म्हणून त्यांना त्यांच्या पहिल्या नोकरीतून काढून टाकले गेले. हा अपमान त्यांच्यासाठी मोठी शिकवण ठरला.
advertisement
5/10
दुसरी नोकरी मिळाली, पण तोपर्यंत कोव्हिड महामारी आली आणि सगळी कामे ठप्प झाली. काम मिळेनासे झाल्यावर त्यांना पुन्हा गावी परतावं लागलं. गावी परतल्यावर कुटुंबाकडून त्यांच्या लग्नासाठी प्रचंड दबाव येऊ लागला. आयुष्याच्या या टप्प्यावर सौरभ एका मोठ्या मानसिक संघर्षातून जात होते. इथूनच खरा त्यांचा प्रवास सुरू झाला असं ते सांगतात.
advertisement
6/10
मन मारून जगण्याऐवजी, सौरभ यांनी स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याचे आणि जगासमोर स्वतःला आहे तसे स्वीकारण्याचे धाडस दाखवले. ज्या आई-वडिलांना ते कमी शिकलेले समजत होते, त्या आई-वडिलांनी त्यांचे मन आणि त्यांच्या मनातील यातना समजून घेतल्या.
advertisement
7/10
कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता त्यांनीही सौरभला साथ दिली. आई-वडिलांनी प्रेम आणि समजूतदारपणा दाखवून त्यांना साथ दिली. हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
advertisement
8/10
कुटुंबाचा पाठिंबा मिळताच सौरभ यांनी पुढील ५ वर्षे प्रचंड मेहनत घेतली. आई-वडिलांना प्रत्येक पावलावर अभिमान वाटावा यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी LV, Gucci, Prada, Dior सारख्या आंतरराष्ट्रीय आणि नामांकित ब्रँड्ससोबत फॅशन डिझाइनची कामं केली.
advertisement
9/10
एक वेळी अशी आली की त्यांनी स्वत:ला स्वीकारलं आता त्यांना जगासमोर यायचं होतं. इतके दिवस पडद्याआड लपून काम करणाऱ्या चेहऱ्याने अखेर सोशल मीडियावर रिल्स करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक नकारात्मक कमेंट्स आणि अडथळे आले, पण त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.
advertisement
10/10
जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्हाला जग स्वीकारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्या मनाच्या आतला आवाज ऐका. आयुष्य आपलं आहे, जे मनापासून जगलं पाहिजे असा मेसेज ते आजच्या तरुण पिढीला देतात. आज जगभरातून त्यांचे ३ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: 'गावाहून आलाय' म्हणून हिणवलं, अपमान गिळला; आज त्याच सौरभ पांडे यांनी LV आणि Gucci सोबत केलं काम