TRENDING:

Success Story:फक्त 10,000 टाकले अन् तब्बल 1 लाख मिळाले, फुलांनी बहरलं शेतकऱ्याचं आयुष्य

Last Updated:
मका, गहू, सोयाबीन हे शेतकऱ्यांचं पारंपरिक पीक, हे सोडून काही वेगळं घ्यायचं म्हटलं की पोटात गोळाच येतो. वातावरणातला बदल, जमीन आणि एवढे पैसे घालून पीक चांगलं आलंच नाही तर करायचं काय? असाही प्रश्न असतो. मात्र पारंपरिक पिकांना बाजूला करुन एक जोखीम या शेतकऱ्याने उचलली आणि त्याची ही जोखीम यशस्वी ठरली. जेवढा पैसा त्याला आधीच्या पिकातून येत नव्हता त्यापेक्षा जास्त पैसे या पिकातून येऊ लागले.
advertisement
1/10
फक्त 10,000 टाकले अन् तब्बल 1 लाख मिळाले, फुलांनी बहरलं शेतकऱ्याचं आयुष्य
शेतकऱ्याने फुलांची शेती केली आणि या फुलांनी त्याच्या आयुष्यात रंग भरले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, घरात धनलक्ष्मी आली. एका एकरातच मोठा नफा झाला. या शेतकऱ्याने कोणत्या फुलांची शेती केली, तो कुठला आहे, त्यांच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी प्रत्येक शेतकऱ्याला नव्याने उमेद देणारी आहे.
advertisement
2/10
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याच्या मुलताई तालुक्यातील सिरसावाडी गावातील शेतकरी काशीनाथ खाडे यांची यशोगाथा सध्या इतर शेतकऱ्यांसाठी नवी दिशा देणारी ठरू शकते. काशीनाथ यांनी सोयाबीन आणि मक्यासारख्या पारंपरिक पिकांची शेती सोडून आपल्या एका एकर जमिनीत आफ्रिकन झेंडूच्या फुलांची (African Marigold) लागवड केली.
advertisement
3/10
या फुलांच्या लागवडीतून ते प्रति एकर तब्बल एक लाख रुपये नफा कमावत आहेत. विशेष म्हणजे, या फुलांचा उपयोग औषधे आणि खत बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पिकासाठी खात्रीशीर बाजारपेठ मिळाली आहे. मी २५ वर्षे ते शेती करत आहेत. माझ्याकडे एकूण ९ एकर जमीन आहे.
advertisement
4/10
कधी हवामान बदलामुळे, तर कधी कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पारंपरिक पिकांमध्ये उत्पादन खर्च काढणेही कठीण झालं. त्यामुळे काय करावं सुचेना, कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणाऱ्या पर्यायी पिकाच्या शोधात मी होतो. गेल्या वर्षी आमच्या गावात पांढुर्णा जिल्ह्यातील एका खासगी कंपनीचे लोक आले.
advertisement
5/10
कंपनी फुलांपासून खत आणि औषधे बनवते, अशी माहिती त्यांनी दिली आणि एक आकर्षक ऑफर दिली. कंपनीने 2,700 प्रति एकर या दराने झेंडूचे बियाणे उपलब्ध करून दिलं असं काशीनाथ यांनी सांगितलं.
advertisement
6/10
लागवडीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक मार्गदर्शनही कंपनीकडून देण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतात तयार होणारी सर्व फुले १० रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याची खात्री कंपनीने दिली. काशीनाथ यांना हा करार आवडला. बियाणे, खत आणि औषधांवर त्यांना प्रति एकर केवळ १० हजार रुपयांच्या आसपास खर्च आला.
advertisement
7/10
झेंडूच्या फुलांचे हे पीक केवळ दीड महिन्यात काढणीसाठी तयार होतात. एका पिकातून सुमारे 10 वेळा फुलांची तोडणी करता येते. पहिल्यांदा काशीनाथ यांनी चार एकर जमिनीत आफ्रिकन झेंडूची लागवड केली. ते सांगतात की, सुरुवातीला रोपवाटिका तयार केली जाते आणि एका महिन्यानंतर रोपांची लागवड होते.
advertisement
8/10
या पिकाला नियमित पाणी, खत आणि रोग नियंत्रणासाठी जैविक खते दिली जातात. सुमारे दोन महिन्यांनंतर फुलं येण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यांपर्यंत तोडणी सुरू राहते. काशीनाथ सांगतात की, त्यांच्या चार एकर शेतीत दर आठवड्याला सुमारे पाच हजार किलो फुलं निघतात.
advertisement
9/10
सध्या त्यांना प्रति एकर जवळपास एक लाख रुपयांचा नफा मिळत आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे हे रोख रक्कम मिळवून देणारे पीक आहे. कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांना फुले बाजारात विकण्याची परवानगी नाही. कंपनीचे लोक दर आठवड्याला फुले घेण्यासाठी येतात.
advertisement
10/10
काशीनाथ आणि त्यांचे कुटुंब सायंकाळच्या वेळी फुलांची तोडणी करतात, संध्याकाळी फुलं तोडून ठेवली की खराब होत नाहीत. फुले घेऊन गेल्यावर काही दिवसांतच त्यांना पेमेंट मिळते. आतापर्यंत त्यांना दोन लाख रुपये मिळाले असून, पुढील वर्षापासून नऊ एकर जमिनीवर झेंडूची लागवड करण्याची त्यांची योजना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story:फक्त 10,000 टाकले अन् तब्बल 1 लाख मिळाले, फुलांनी बहरलं शेतकऱ्याचं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल