TRENDING:

Success Story: जुन्या कापडाला दिला आकार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरू केला बाहुल्यांचा व्यवसाय, कमाई IT इंजिनिर एवढी

Last Updated:
15 वर्ष नोकरी करुन वैतागले, गलेलठ्ठ पगार सोडून डोंगरात राहिले, जुन्या कपड्यांपासून सुरू केला व्यवसाय, वर्षाला IT इंजिनियरपेक्षाही जास्त कमाई
advertisement
1/9
जुन्या कापडाला दिला आकार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, केला बहुल्यांचा व्यवसाय
जे जुने कपडे आपण सहज टाकून देतो, त्याच निरुपयोगी वाटणाऱ्या वस्तूंमधून सुनीता आणि सुहास रामेगौडा या दाम्पत्याने आज लाखो रुपयांची कमाई केली आहे. हे दाम्पत्य जुन्या कपड्यांना आकार देऊन त्यापासून आकर्षक बाहुल्या, किचेन तयार करत आहेत. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला.
advertisement
2/9
या कल्पनेबद्दल बोलताना सुनीता आणि सुहास सांगतात की, लहानपणी त्यांनी त्यांच्या आजीला जुन्या कपड्यांपासून बाहुल्या बनवताना पाहिले होते आणि याच आठवणीतून त्यांना हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. सुहास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाहुल्यांची रचना अशी केली आहे की त्यांचे कपडे बदलता येतात. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अशा प्रकारे साकारले जातात की ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
advertisement
3/9
जुन्या कपड्यांपासून बाहुल्या बनवल्यामुळे, मोठ्या प्रमाणात कापड 'लँडफिल'मध्ये जाण्यापासून वाचले आहे. ते सांगतात की, अंदाजे ८,००० किलोपेक्षा जास्त कापड कचऱ्यात जाण्यापासून आम्ही वाचवलं आहे. या स्टार्टअपचा सर्वात महत्त्वाचा सामाजिक परिणाम म्हणजे त्यांनी तामिळनाडूच्या नीलगिरी भागातील आदिवासी समुदायाच्या महिलांना रोजगार देऊन त्यांना सशक्त केला जात आहे.
advertisement
4/9
आज त्यांच्या या उद्योगाशी २०० हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. सुनीता आणि सुहास यांनी लग्नानंतर कमीतकमी १५ वर्षे बंगळूरु शहरात कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र, या नोकरीमुळे ते समाधानी नव्हते. त्यांना असे काम करायचे होते, ज्यात त्यांना खरा आनंद मिळेल. सुहास सांगतात की, शहरी जीवनातील धावपळीमुळे ते थकून गेले होते आणि त्यांना कशात आनंद मिळेल, याचा शोध घ्यायचा होता.
advertisement
5/9
या शोधातूनच त्यांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांनी नीलगिरीच्या डोंगरांमध्ये राहण्याचे निश्चित केले. तिथे त्यांनी स्वतः मातीचे घर बांधले, स्वतःच्या भाज्या पिकवल्या. डोंगरावरून वाहणाऱ्या नद्यांमधून पाणी गोळा केले आणि विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर केला.
advertisement
6/9
नीलगिरीत वास्तव्यास असताना, सुहास यांनी पाहिले की तिथल्या आदिवासी लोकांसाठी उपजीविका हा एक रोजचा मोठा संघर्ष आहे. चहाच्या पानांची तोडणी वगळता, ग्रामीण महिलांसाठी कोणतेही नियमित काम उपलब्ध नव्हते. दररोज सकाळी त्या महिला आपल्या मुलांना सोडून दुसऱ्या गावी कामासाठी जात असत. आदिवासी समुदायाच्या या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने या जोडप्याने २०१९ मध्ये 'इंडियन यार्ड्स फाउंडेशन'ची स्थापना केली.
advertisement
7/9
हे फाउंडेशन हस्तकला उत्पादनांशी जोडलेले एक सामाजिक उपक्रम होते. सुरुवातीला त्यांनी गावातील महिलांना भरतकाम (कढई) आणि इतर कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. कालांतराने, या उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या गरजेतून, २०२३ च्या सुरुवातीला 'द गुड गिफ्ट'ची स्थापना झाली. अनेक उत्पादनांवर प्रयोग केल्यानंतर, त्यांनी कापडी बाहुले आणि खेळण्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले.
advertisement
8/9
स्टार्टअप सुरू केल्याच्या एका वर्षाच्या आतच या जोडप्याने आपला व्यवसाय 'बी-टू-बी' (B2B) मॉडेलमध्ये वाढवला. आज चेन्नई, बंगळूरु, गोवा, ऊटी यांसारख्या शहरांमधील ६० हून अधिक ऑफलाइन स्टोअरमध्ये त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. ते दरमहा ३,००० हून अधिक कापडी बाहुल्यांची विक्री करतात.
advertisement
9/9
मागील आर्थिक वर्षात त्यांचा महसूल ७५ लाख रुपये होता. सुनीता यांच्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आदिवासी महिला आज दरमहा ८ ते १० हजार रुपये कमावत आहेत. या उत्पन्नामुळे नीलगिरीतील या महिलांचे केवळ आर्थिक सक्षमीकरण झाले नसून, त्यांना समाजात सन्मानाचे स्थानही मिळाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: जुन्या कापडाला दिला आकार, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरू केला बाहुल्यांचा व्यवसाय, कमाई IT इंजिनिर एवढी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल