iphone सारखे भारी फोटो तेही 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये, बॅटरीही तगडी 5 फोन सर्वात बेस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Samsung Galaxy A17 5G, Moto G 96 5G, Vivo T4R, iQOO Z10R आणि Realme UI हे 20 हजारांखाली दमदार बॅटरी, कॅमेरा व फास्ट चार्जिंगसह बजेट स्मार्टफोन पर्याय आहेत.
advertisement
1/11

iphone साठी किमान 50-60 हजार रुपये घालवायला हवेत. नवीन 17 घ्यायचा तर 83 हजार ते एक लाख घालवायला हवेत. बरं त्याचं मूल्य खरेदी केल्यानंतर लगेच काही दिवसांनी कमी होतं. तो बिघडला तर दुरुस्त करायला खर्चही परवडणारा नसतो. आयफोनची बॅटरी देखील कमी असते. मग तुम्हाला दमदार बॅटरी चांगला कॅमेरा हवा असेल तर अगदी 20 हजार रुपयांमध्येही दमदार फोन मिळू शकतो. 5 असे कोणते बजेट फ्रेंडली फोन आहेत जाणून घेऊया.
advertisement
2/11
Samsung Galaxy A17 5G- विश्वसनीय ब्रँड आणि बॅलन्स्ड परफॉर्मन्स शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. यात 6.6 इंचाची Super AMOLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह येतो. Exynos 1330 प्रोसेसरमुळे फोन अधिक वेगवान चालतो आणि Android 15 आधारित One UI वर कार्यरत आहे.
advertisement
3/11
कॅमेऱ्याच्या बाबतीत यात 50MP + 8MP + 2MP असा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. यामध्ये 128 GB and 256 GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
advertisement
4/11
Moto G 96 5G- स्टॉक अँड्रॉइड अनुभव आणि प्रीमियम बिल्ड क्वालिटी हवी असल्यास हा Motorola चा फोन सर्वोत्तम आहे. 6.7 इंचाची P-OLED स्क्रीन, 144Hz रिफ्रेश रेट आणि कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतो. Snapdragon 7S Gen 2 प्रोसेसरसह 5000mAh बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे.
advertisement
5/11
ग्राहकांना या फोनमध्ये 50MP OIS मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. स्टोरेजचा विचार करायचा झाला तर 8GB + 128GB आणि 12GB + 256GB पर्याय उपलब्ध आहेत. कॅम्पॅक्ट आणि बेस्ट फोन म्हणून कमी कालावधीत हा फोन मार्केटमध्ये हिट झाला आहे.
advertisement
6/11
Vivo T4R- Vivo चा हा प्रीमियम लूक असलेला फोन 6.78 इंच AMOLED कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतो आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर असून Android 15 वर चालतो. स्टोरेज पर्याय- 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB.
advertisement
7/11
20 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये हे सर्व फोन जबरदस्त फीचर्ससह येतात. दमदार परफॉर्मन्सपासून ते आकर्षक डिझाइन आणि फास्ट चार्जिंगपर्यंत सर्व सुविधा या स्मार्टफोन्समध्ये मिळतात. तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडून तुम्ही कमी बजेटमध्येही प्रीमियम स्मार्टफोन अनुभव घेऊ शकता.
advertisement
8/11
iQOO Z10R- हा फोन 6.78 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 5700mAh बॅटरीसह 44W फास्ट चार्जिंगची सोय दिली आहे. Snapdragon 7S Gen 3 प्रोसेसरवर आधारित हा फोन Android 15 UI वर चालतो.
advertisement
9/11
50MP मुख्य रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे, तर ड्युअल रियर कॅमेरा सेटअपही आहे. डे लाईटमध्ये यामध्ये फोटो चांगले येतात असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय बॅटरीसाठी हा फोन सर्वात चांगला परफॉर्मन्स देणारा आहे.
advertisement
10/11
20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा हा एक जबरदस्त पर्याय आहे. यात 6.82 इंचाची AMOLED स्क्रीन असून 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सुविधा दिली आहे. फोनला MediaTek Dimensity 8300 प्रोसेसरची ताकद मिळते आणि हा Android 15 आधारित Realme UI वर चालतो.
advertisement
11/11
कॅमेऱ्याच्या बाबतीत 64MP + 8MP + 2MP असा ट्रिपल रियर कॅमेरा तर 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये डे लाईट फोटो एकदम चांगले येतात शिवाय फिल्टर्स देखील देण्यात आले आहेत. या फोनला तगडा स्टोरेज पर्याय दिला आहे. 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iphone सारखे भारी फोटो तेही 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये, बॅटरीही तगडी 5 फोन सर्वात बेस्ट