Iphone यूझर्ससाठी गुड न्यूज! मिळणार जबरदस्त फीचर, असं करा इंस्टॉल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आयफोन यूझर्सना लवकरच अनेक नवीन फीचर्स मिळतील. पुढील काही तासांत अॅपल iOS 26.2 अपडेट रोल आउट करण्याची अपेक्षा आहे. त्यात लिक्विड ग्लास स्लायडर आणि नवीन सेफ्टी अलर्ट्सचा समावेश असेल.
advertisement
1/5

iOS 26.2 Update: आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांना त्याच्या फोनमध्ये नवीन फीचर्स मिळतील. म्हणजेच आयफोन यूझर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट येतंय. रिपोर्टनुसार, अ‍ॅपल पुढील काही तासांत iOS 26.2 रिलीज करण्याची अपेक्षा आहे.
advertisement
2/5
कंपनीने बीटा टेस्टर्ससाठी त्याचे रिलीज कॅन्डिडेट (RC) व्हर्जन आधीच रोल आउट केलेय. म्हणजेच ते लवकरच सर्व यूझर्ससाठी रोल आउट केले जाईल. आयफोन यूझर्सना या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/5
iOS 26.2 मध्ये नवीन काय? : iOS 26.2 अपडेट अनेक डिझाइन बदल आणि नवीन फीचर्स आणते. सर्वात महत्त्वाची एडिशन म्हणजे लॉक स्क्रीनवरील लिक्विड ग्लास स्लायडर. यामुळे यूझर्सना घड्याळाची पारदर्शकता अॅडजस्ट करण्याची परमिशन मिळेल.
advertisement
4/5
याव्यतिरिक्त, युरोपियन देशांमधील यूझर्ससाठी एअरपॉड्समध्ये लाइव्ह ट्रान्सलेशन फीचर जोडले जात आहे. प्रोडक्टव्हिटीला देखील मोठी चालना मिळेल. रिमाइंडर्स अॅपमध्ये आता अलार्म सपोर्ट जोडला जातोय. Apple CarPlay मध्ये नवीन फीचर्स देखील जोडली जाताय.
advertisement
5/5
Apple सर्व्हिसेसमध्ये मिळतील हे अपग्रेड : आगामी अपडेटमध्ये म्यूझिक आणि पॉडकास्ट सारख्या अॅपल सर्व्हिसेस देखील अपग्रेड केल्या जातील. iOS 26.2 अपडेटसह, अॅपल म्युझिकला ऑफलाइन लिरिक्स मिळतील. ज्यामुळे यूझर्स इंटरनेट अॅक्सेसशिवाय गाण्यांसोबत गुणगुणू शकतील. अॅपल पॉडकास्टमध्ये AI-जनरेटेड चॅप्टर आणि Apple News मध्ये एक नवीन लेआउट देखील असेल. नवीन अपडेट सुरक्षा अलर्ट आणि AirDrop सुरक्षा देखील सुधारते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Iphone यूझर्ससाठी गुड न्यूज! मिळणार जबरदस्त फीचर, असं करा इंस्टॉल