'ही गोष्ट जमली तरच आई होईन', हृता दुर्गुळेनं अखेर प्रेग्नंसीच्या प्रश्नांवर दिलं उत्तर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hruta Durgule on Pregnancy : अभिनेत्री हृता दुर्गुलेच्या लग्नाचा चार वर्ष झाली आहेत. ती आई कधी होणार असा प्रश्न तिला अनेकदा विचारला जातो. अखेर हृताने या प्रश्नांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

लग्न झाल्यानंतर मुलीला काही महिन्यांची किंवा वर्षांनी तू आई कधी होणार? चान्स कधी घेणार असे प्रश्न विचारले जातात. मग ती मुलगी फेमस अभिनेत्री का असेना. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री देखील आई कधी होणार याची त्यांनाही उत्सुकता असते. अभिनेत्री हृता दुर्गुळेला देखील ती आई कधी होणार असे प्रश्न विचारले जातात. हृतानं अखेर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
advertisement
2/7
हृताचा उत्तर हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. आई आणि मुलांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं हृतानं तिच्या आईविषयी काही गोष्टी सांगितल्या. हे सांगताना तिनं ती आई कधी होणार याचंही उत्तर दिलं.
advertisement
3/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हृता म्हणाली, "माझी आई मला नेहमी म्हणते, तुला कळेल मुलगी झाल्यावर. मुलही नाही मुलगी झाल्यावर कळेल. आता माझं लग्न होऊन चार वर्ष होतील. माझी फ्लाइट असेल आणि मी मालाडवरून जरी जात असले तरी ती चेंबूरला जागी असते. ते फक्त आईच करू शकते. कितीही रात्र होऊदेत मी सासरीच जाणार आहे मालाडला पण ती रात्री चेंबूरला जाही असते."
advertisement
4/7
"मी 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. पण कधीच असं व्हायचं नाही की दरवाजा उघडल्यानंतर अंधार असायचा. माझी आई नेहमी थांबलेली असायची जी अजूनही थांबते. माझे बाबा, भाऊ आता नवरा प्रतीक झोपतो."
advertisement
5/7
"पण आता मला ते कळतंय की शूटिंगनंतर उशिरा घरी गेल्यानंतर मीच दार उघडून जाते. तेव्हा मी आईवर चिडायचे की मी घरीच येणार आहे. अशा खूप गोष्टी आहे ज्यासाठी मी कधीच तिचे आभार मानले नाहीत म्हणून मी ही फिल्म केली."
advertisement
6/7
आई कधी होणार? चान्स कधी घेणार या आईच्या प्रश्नावर हृता म्हणाली, "मला पिझ्झा खूप आवडतो. माझ्या आईला आवडतो. आम्ही चार लोक आहोत. एक मीडियम पिझ्झा मागवला तरी एक स्लाइज एक्स्ट्रा उरतोच. मग आई नेहमी तो मला किंवा ऋग्वेदला देते."
advertisement
7/7
"ज्या दिवशी मला हे करावंसं वाटेल ना त्या दिवशी मी आई होईन. कारण हा सेल्फनेस फक्त आईकडेच असतो. स्वत:च्या आवडीची गोष्ट मुलाला द्यावी हा नि:स्वार्थीपणा फक्त आईमध्येच असतो. हे मी कधीच करू शकत नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ही गोष्ट जमली तरच आई होईन', हृता दुर्गुळेनं अखेर प्रेग्नंसीच्या प्रश्नांवर दिलं उत्तर