रिटायर्ड आऊट घोषित केलं
निकोलस पूरन याने स्टंपिंग मिस केल्याच्या या घटनेनंतर वाइपर्सच्या टीमने लगेच होल्डनला पॅव्हेलियनमध्ये बोलावले आणि त्याला रिटायर्ड आऊट घोषित केलं. डेजर्ट वाइपर्सची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा आंद्रेस गौस 15 बॉलमध्ये 21 धावा करून आऊट झाला. यानंतर फखर जमान आणि मॅक्स होल्डन यांनी संथ पण सावध बॅटिंग करत दुसऱ्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 51 धावा जोडल्या होत्या.
advertisement
जाणूनबुजून स्टंपिंग केली नाही
फखर आऊट झाल्यावर सॅम करन बॅटिंगला आला, पण यावेळी करन आणि होल्डन दोघंही जलदगतीने धावा काढण्यासाठी झुंजताना दिसले 16 व्या ओव्हरमध्ये राशिद खान बॉलिंगसाठी आला तेव्हा होल्डन सतत बीट होत होता. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राशिदच्या गुगलीवर होल्डन बीट झाला आणि तो क्रीजच्या खूप पुढे आला होता. बॉल विकेटकीपर पूरनच्या हातात गेला, पण त्याने त्याला जाणूनबुजून स्टंपिंग केली नाही. हे पाहून वाइपर्सची टीम आश्चर्यचकित झाली.
पाहा Video
37 बॉलमध्ये 42 धावा
पुढच्याच बॉलवर त्यांनी होल्डनला परत बोलावले आणि त्याला रिटायर्ड आऊट दिला. होल्डन 37 बॉलमध्ये 3 फोरच्या मदतीने 42 धावा काढून रिटायर्ड आऊट झाला, तर करनने 19 बॉलमध्ये 19 धावा केल्या. डेजर्ट वाइपर्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 159 धावा केल्या.
MI अमीरातचा पराभव
दरम्यान, एमआय अमीरातची टीम मात्र हा स्कोर चेज करू शकली नाही आणि त्यांना रोमांचक मॅचमध्ये एक रनने पराभव स्वीकारावा लागला. अमीरातची टीम 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सवर 158 धावाच करू शकली. टॉम बॅंटनने 29 बॉलमध्ये 34 धावा, पूरनने 29 बॉलमध्ये 31 धावा आणि कॅप्टन किरॉन पोलार्डने 13 बॉलमध्ये 23 धावांची खेळी खेळली. डेजर्ट वाइपर्सची टीम सध्या आयएल टी20 च्या अंकतालिका मध्ये 8 अंकांसह शीर्षस्थानी आहे, तर एमआय अमीरातची टीम 2 अंक घेऊन चौथ्या स्थानावर आहे.
