Jio फक्त 11 रुपयांत देतंय भारी प्लॅन! मिळेल अनलिमिटेड डेटा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio Prepaid Plan: तुम्ही रिलायन्स जिओला 'शगुन' म्हणून 11 रुपये दिले तर कंपनी तुम्हाला त्या बदल्यात काय देईल, आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलकडेही असाच स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे.
advertisement
1/5

Reliance Jioकडे प्रीपेड यूझर्ससाठी एक उत्तम रिचार्ज प्लॅन आहे. जो खूप कमी किमतीत Unlimited Dataचा लाभ देतो. या स्वस्त प्लॅनची किंमत फक्त 11 रुपये आहे. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या माय जिओ अॅपवर देखील लिस्ट आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर तुम्ही रिलायन्स जिओला 'शगुन' म्हणून 11 रुपये दिले तर कंपनी तुम्हाला त्या बदल्यात कोणते फायदे देईल?
advertisement
2/5
Jio 11 Plan Details : 11 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्लॅनसह, कंपनी प्रीपेड यूझर्सना अनलिमिटेड डेटाचा लाभ देते. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देण्याचे आश्वासन देत असली तरी, तुम्हाला हा प्लॅन 10 जीबीच्या FUP लिमिटसह मिळेल.
advertisement
3/5
Jio 11 Plan Validity : व्हॅलिडिटीविषयी बोलायचे झाले तर, 11 रुपयांच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 1 तास आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचे काही महत्त्वाचे काम असेल ज्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असेल, तर तुम्हाला हा स्वस्त प्लॅन आवडू शकतो.
advertisement
4/5
लक्ष द्या : रिलायन्स जिओचा हा 11 रुपयांचा प्लॅन फक्त एक डेटा पॅक आहे. त्यामुळे तुम्हाला या प्लॅनमध्ये फक्त डेटाचाच फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा उपलब्ध नाहीत. हा प्लॅन खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या जिओ नंबरवर आधीच एक अॅक्टिव्ह प्लॅन असणे आवश्यक आहे. 10 जीबी डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर, या प्लॅनमधील हाय स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.
advertisement
5/5
एअरटेलकडेही असा प्लॅन आहे का? : आता तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की एअरटेल कंपनी देखील असा स्वस्त प्लॅन देते की नाही? एअरटेलचा 11 रुपयांचा प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये 10 जीबी एफयूपी लिमिट आणि 1 तासाच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड डेटा देखील मिळतो.