TRENDING:

Jio, Vi आणि Airtel यूझर्स फ्रीमध्ये पाहू शकता IPL 2025! झटपट पहा ट्रिक

Last Updated:
तुम्हीही Jio, VI किंवा Airtel सिम कार्ड वापरता का? अशा प्रकारे तुम्ही IPL 2025 चा मोफत आनंद घेऊ शकता. तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शनवर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
advertisement
1/5
Jio, Vi आणि Airtel यूझर्स फ्रीमध्ये पाहू शकता IPL 2025! झटपट पहा ट्रिक
आयपीएल 2025 आजपासून सुरू होत आहे आणि जर तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च न करता ते फ्री पाहण्याचा मार्ग शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ, एअरटेल आणि व्हीआय त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत. जेणेकरून तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न देता तुमच्या मोबाइलवर आयपीएलचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. या कंपन्यांच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊया. ज्यांच्या मदतीने तुम्हाला JioHotstar चे सबस्क्रिप्शन फ्री मिळत आहे.
advertisement
2/5
Jio यूझर्स अशा प्रकारे IPL पाहू शकता फ्रीमध्ये : तुम्ही देखील जिओ यूझर असाल तर कंपनी तुमच्यासाठी 949 रुपयांचा एक खास प्लॅन घेऊन आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला नियमित डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्ससह फ्री जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळत आहे. जेणेकरून तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च न करता IPL 2025 चा मोफत आनंद घेऊ शकाल.
advertisement
3/5
तसंच, जर तुमच्याकडे आधीच अॅक्टिव्ह प्लॅन असेल, तर तुम्ही 100 रुपयांच्या डेटा पॅकसह JioHotstar चा फ्री अॅक्सेस देखील मिळवू शकता. या प्लॅनमध्ये 5GB डेटा उपलब्ध आहे, ज्याची व्हॅलिडिटी 90 दिवसांची असेल. तसंच, त्यात व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा नाही.
advertisement
4/5
Vi यूझर्ससाठी फ्री आयपीएल स्ट्रीमिंग ऑफर : Vi त्यांच्या कोट्यवधी यूझर्सना एका खास प्लॅनसह फ्री जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील देत आहे. खरंतर, कंपनी 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये JioHotstar चे 3 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 5GB डेटा देखील मिळत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय आयपीएलचा आनंद घेऊ शकता. तसंच, या योजनेत कॉलिंग सुविधा देखील प्रदान केलेली नाही.
advertisement
5/5
Airtel यूझर्स असा घेऊ शकता फ्री IPL चा आनंद : जिओ प्रमाणे, एअरटेल देखील त्यांच्या रेग्युलर प्लॅनसह जिओहॉटस्टारचे 3 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनची ​​किंमत 549 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा सुविधा देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, एअरटेलकडे JioHotstar सबस्क्रिप्शनसह दोन स्वस्त प्लॅन आहेत. ज्यांची किंमत 100 रुपये आणि 195 रुपये आहे. 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा आणि 30 दिवसांसाठी जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते. तर 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15GB डेटा आणि 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचा फ्री अॅक्सेस मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Jio, Vi आणि Airtel यूझर्स फ्रीमध्ये पाहू शकता IPL 2025! झटपट पहा ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल