मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी गाडीच निघाली खराब, कंपनीने रिटर्न मागवल्या 40,000 कार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मारुती सुझुकीने ग्रँड विटारा SUVच्या ३९,५०६ युनिट्स तांत्रिक त्रुटीमुळे परत मागवल्या आहेत. ग्राहकांना तपासणीसाठी बोलावले जाईल व दुरुस्ती मोफत केली जाईल.
advertisement
1/7

ग्रामीण भागापासून ते शहरातही आणि मध्यम वर्गीयांपासून ते अप्पर मिडलक्लास ज्याला म्हणतो तेही मारुती कंपनीच्या गाड्यांवर आजही तेवढेच विश्वास ठेवून आहेत. सर्वात प्रसिद्ध आणि लाडकी कंपनी भारताचा नंबर वन ब्रॅण्ड म्हणून मारुतीची ओळख आहे. मात्र याच मारुती कंपनीच्या एका गाडीच्या मॉडेलमध्ये गडबड झाली आहे. त्यामुळे कंपनीने 40 हजारहून अधिक गाड्या कंपनीत परत मागवल्या आहेत.
advertisement
2/7
तुम्ही जर मारुतीची ही गाडी बुक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मारुती सध्या आपले अपग्रॅड मॉडेल लाँच करत आहे. त्याच दरम्यान लोकप्रिय ग्रँड विराटा SUV मॉडेलमध्ये काहीतरी गडबड जाणवली असल्याने तातडीनं कंपनीने सगळ्या गाड्या पुन्हा मार्केटमधून कंपनीत बोलवल्या आहेत. ग्रँड विटारा या फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या ३९,००० हून अधिक युनिट्सला तातडीने पुन्हा मागवले आहेत. कंपनीने या युनिट्समध्ये तांत्रिक त्रूटी असल्याचं मान्य केलं असून, ही समस्या दुरुस्त करून ती ग्राहकांना विनामूल्य परत केली जाईल.
advertisement
3/7
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने नुकतीच याबाबत माहिती दिली. ९ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत तयार झालेल्या ग्रँड विटारा एसयूव्हीमध्ये स्पीडोमीटर असेंब्लीतील 'फ्यूल लेव्हल इंडिकेटर' आणि वॉर्निंग लाइटमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही घटक कधीकधी इंधनाची स्थिती योग्यरित्या दाखवत नाहीत. यामुळे वाहन चालकांना टाकीत नेमके किती इंधन शिल्लक आहे, याची अचूक माहिती मिळत नाही आणि हे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
advertisement
4/7
कंपनीने मागवलेल्या गाड्यांमध्ये एकूण ३९,५०६ युनिट्सचा समावेश आहे. अधिकृत डिलर्स, ग्राहकांशी कंपनीकडून संपर्क साधण्यात येईल. ग्राहकांना त्यांच्या जवळच्या मारुती सुझुकी वर्कशॉपमध्ये तपासणीसाठी बोलावले जाईल. तिथे गाडीचं पूर्ण चेकिंग होईल गरज पडल्यास ते पूर्णपणे बदलले जाईल. या सगळ्यासाठी ग्राहकांना कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही.
advertisement
5/7
कंपनीने ग्राहकांना वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. मागील काही वर्षांत भारतातील ऑटो कंपन्यांमध्ये सुरक्षा आणि गुणवत्तेबद्दलची जबाबदारीची भावना वाढताना दिसत आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून कंपनीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. सध्या ही गाडी त्यामुळे तुफान ट्रेंडमध्ये आली आहे.
advertisement
6/7
मारुती सुझुकी सध्या भारतीय बाजारात एसयूव्ही पोर्टफोलिओ वेगाने वाढवत आहे. या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. टोयोटासोबत मिळून विकसित केलेली ग्रँड विटारा ही कंपनीच्या फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. यामध्ये स्ट्रॉन्ग-हायब्रिड पॉवरट्रेन आणि ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्याय मिळतो, ज्यामुळे ती शहरी आणि कुटुंब-केंद्रित ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.
advertisement
7/7
या रिकॉलनंतर ग्राहकांनी त्वरित कंपनीशी संपर्क साधून आपल्या वाहनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कंपनीने अलीकडेच जीएसटी सुधारणांनंतर ग्रँड विटाराच्या किंमतीत १,०७,००० रुपयांपर्यंत कपात केली होती. सध्या या एसयूव्हीची किंमत १०.७७ लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलची किंमत 20 ते 21 लाखांपर्यंत जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी गाडीच निघाली खराब, कंपनीने रिटर्न मागवल्या 40,000 कार