दुधाच्या हिशोबाचं आता नो टेन्शन ! सोलापूरकर तरुणांनी बनवलं खास ॲप
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prasad Diwanji
Last Updated:
सोलापुरातील दोघा इंजिनिअर तरुणांनी दूध विक्रेते, ग्राहक आणि डेअरी चालकांसाठी खास दूध ईआरपी हे ॲप विकसित केलंय. त्यामुळे दुधाच्या हिशोब आता एका क्लिकवर करता येणार आहे.
advertisement
1/7

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून काही क्षणांत होत आहेत. त्यामुळे या व्यवहारांत अचुकता आणि पारदर्शकताही आलीय. आता दूध विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील हिशोबाचा घोळ कायमचा मिटणार आहे.
advertisement
2/7
सोलापुरातील दोघा इंजिनिअर तरुणांनी त्यासाठी खास दूध ईआरपी हे ॲप विकसित केलंय. विशेष म्हणजे हे ॲप डेअरी मालक, दूध विक्रेते आणि ग्राहक या तिघांनाही वापरता येणार आहे.
advertisement
3/7
सोलापुरातील सागर दुधनकर आणि अभिषेक लोमटे या दोघांनी आपल्या घरातील दैनंदिन दुधाचा हिशोब चोख ठेवण्यासाठी एक ॲप बनवलंय. तसं पाहिलं तर ही समस्या फार छोटी वाटते. पण त्यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. त्यावर उपाय म्हणून हे ॲप बनवण्यात आलंय.
advertisement
4/7
या ॲपच्या माध्यमातून दैनंदिन दुधाच्या नोंदी, बिल आणि हिशोब काही मिनिटांत करता येणार आहे, असे सागर दुधनकरने सांगितले.
advertisement
5/7
दूध ईआरपी हे ॲप डेअरी मालक, दूध विक्रेते आणि ग्राहक यांना वापरता येते. दूध ग्राहकांना हे ॲप मोफत वापरता येते. डेअरी मालक आणि घरोघरी दूध विक्री करणाऱ्यांना मात्र या ॲपसाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क दिवसाला दीड रुपया म्हणजेच वर्षाला 599 रुपये इतके आहे. परंतु, या शुल्कात दुधाशी संबंधित सर्व प्रकारचे हिशोब आणि मेसेज देवाण-घेवाणीची सोय ॲपमध्ये आहे.
advertisement
6/7
दूध ईआरपीमध्ये दुधाचा दैनंदिन हिशोब ठेवता येतो. ग्राहकांना दिवसाची दुधाची खरेदी आणि महिन्याचे बिल एका क्लिकवर मिळते. ॲपमध्ये डेटा सेव्ह होतो तसेच पीडीएफ स्वरुपात हा हिशोब मिळवता येतो. तर विक्रेते आणि डेअरी मालक यांना दैनंदिन नोंदी, हिशोब ठेवण्याची सोय ॲपमध्ये आहे.
advertisement
7/7
तसेच महिन्याच्या शेवटी अगदी काही मिनिटांत सर्व ग्राहकांचे बिल तयार करून त्यांना पाठवता येते. तसेच एखाद्या दिवशी दूध वितरण शक्य नसेल तर त्याबाबत मेसेजची देवाण-घेवाणही ॲपच्या माध्यमातून करता येते, असंही दुधनकर यांनी सांगितलं. (प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
दुधाच्या हिशोबाचं आता नो टेन्शन ! सोलापूरकर तरुणांनी बनवलं खास ॲप