TRENDING:

royal enfield : अजून काय हवंय! आवडती बुलेट घेऊन जा फक्त 1200 रुपयांमध्ये, सुपर असा प्लॅन

Last Updated:
रॉयल एनफील्डने एक खास असा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे कुणीही आपल्या दारात बुलेट उभी करू शकतो. कंपनीने आपल्या गाड्यांसाठी...
advertisement
1/7
royal enfield :अजून काय हवंय! आवडती बुलेट घेऊन जा फक्त 1200 रुपयांमध्ये
रॉयल एनफील्ड म्हटल्यावर धडधड आवाज करणारी बुलेट डोळ्यासमोर येते. मजबूत आणि वजनदार असलेली बुलेट तरुणांच्या गळातलं ताईत आहे. रॉयल एनफील्डनेही बाईक मार्केटमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. वेळोवेळी अपडेट आणि नव्या गाड्या लाँच करत असते. पण किंमत जास्त असल्यामुळे बुलेट चालवण्याचं अनेकांचं स्वप्नपूर्ण होत नाही. त्यामुळेच आता कंपनीने तुम्हाला आवडणारी बुलेट ही अवघ्या 1200 रुपयांमध्ये वापरण्याचा सुपर प्लॅन आणला आहे.
advertisement
2/7
रॉयल एनफील्डने एक खास असा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे कुणीही आपल्या दारात बुलेट उभी करू शकतो. कंपनीने आपल्या गाड्यांसाठी रेंटल प्रोग्राम (Rental Program) लाँच केला आहे. त्यामुळे तुम्ही बुलेट ही भाड्याने अर्थाने रेंटने चालवण्यासाठी घेऊन जाऊ शकतात.
advertisement
3/7
पण या प्लॅनमध्ये अनेक अटी आणि शर्ती आहे. तुर्तास कंपनीने हा प्लॅन मोजक्याच शहरांमध्ये सुरू केला आहे. यामध्ये दिल्ली, जयपुर, जैसलमेर, हरिद्वारसह 25 शहरांचा समावेश आहे. इतरही शहरात हा प्लॅन लवकरच सुरू करणार आहे.
advertisement
4/7
काय आहे हा प्लॅन? - जी लोक दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन आखत आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनच्या अंतर्गत तुम्ही रॉयल एनफील्डची बाईक ही रेंटवर घेऊन जाऊ शकतात.
advertisement
5/7
या प्लॅनची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही रॉयल एनफील्डच्या वेबसाईटवर वाचू शकतात. सध्या 40 वेगवेगळ्या ऑपरेटरच्या माध्यमातून जवळपास 300 बुलेट या रेंटवर दिल्या आहेत. तुम्ही खूप कमी खर्चांमध्ये प्रतिदिवस दराने रॉयल एनफील्ड बाईक रेंटने घरी नेऊ शकतात.
advertisement
6/7
रॉयल एनफील्ड बाइक रेंटने घेण्याआधी तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी कंपनीने आपल्या अधिकृत साईटवर (https://www.royalenfield.com/in/en/rentals/) माहिती उपलब्ध केली आहे.
advertisement
7/7
या वेबसाईटवर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे. सोबतच पिकअप आणि गाडी सोडण्याची अर्थात ड्रॉपची माहितीही द्यावी लागणार आहे. बाईकच्या मॉडेलनुसार प्रतिदिवस तुम्हाला भाडे आकारले जाणार आहे. तुम्ही जर दिल्लीत राहत असाल तर तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेटसाठी प्रतिदिवस 1,200 रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्याच ठिकाणी एडव्हेंचर बाइक हिमालयनसाठी 1533 रुपये भाडे मोजावे लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
royal enfield : अजून काय हवंय! आवडती बुलेट घेऊन जा फक्त 1200 रुपयांमध्ये, सुपर असा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल