TRENDING:

Realmeच्या 2 फोनच्या किंमतीत मोठी कपात! ऑफर पाहून झटपट होताय ऑर्डर

Last Updated:
तुम्हाला रियलमी फोन आवडत असेल तर तुमच्यासाठी कंपनीने भारी ऑफर आणली आहे. ग्राहक कंपनीची सी सीरीज कमी किंमतीत घरी आणू शकतात.
advertisement
1/6
Realmeच्या 2 फोनच्या किंमतीत मोठी कपात! ऑफर पाहून झटपट होताय ऑर्डर
रियलमी चाहत्यांना नेहमीच कंपनीच्या नवनवीन फोनची प्रतीक्षा असते. जेणेकरुन ते स्वतःसाठी काही चांगला ऑप्शन खरेदी करु शकतील. खरंतर काही लोक असेही असतात. जे जुने फोन स्वस्त होण्याची वाट पाहत असतात. तुम्हालाही रियलमी फोन आवडत असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
advertisement
2/6
कारण रियलमीचा फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकणार आहात. चला जाणून घेऊया अशा दोन फोन्सविषयी जे स्वस्तात उपलब्ध करुन दिले जात आहेत. रियलमी.कॉम वरुन मिळालेल्या माहितीनुसार रियलमी C51 च्या 4 जीबी, 64 जीबी स्टोरेजचा फोन 8,999 रुपयांऐवजी 7,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.
advertisement
3/6
फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, या फोनमध्ये 6.71-इंचांचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आलाय. ज्यात HD+ रेझोल्यूशन आणि 90Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्ले पॅनलमध्ये 560 निट्स ब्राइटनेस आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. डिव्हाइसमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही आहे आणि स्टोरेजला 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.
advertisement
4/6
कॅमेरा म्हणून Realme C51 मध्ये ड्यूअल-कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. पॉवरसाठी रियलमी C51 मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते. जी 33W च्या फास्ट चार्जिंगसह येते.
advertisement
5/6
Realme C53 वर डिस्काउंट : रियलमी C53 च्या 6GB व्हेरिएंट ग्राहक 1,1999 रुपयांऐवजी 9,999 रुपयांत खरेदी करु शकतात. तर याच्या 4जीबीला 9,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांत खरेदी केलं जाऊ शकतं. रियलमी C53 मध्ये 6.74 -इंचांचा 90Hz चा डिस्प्ले देण्यात आलाय. ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3% आणि 560 निट्स पीक ब्राइटनेस आहे.
advertisement
6/6
स्क्रीन 180Hz च्या टच सँपलिंग रेटसह येते. फोन ARM माली-G57 GPU आणि 12nm, 1.82GHz CPU सह ऑक्टा-कोर चिपसेटसह येतो. कॅमेरा म्हणून लेटेस्ट रियलमी फोनच्या मागच्या बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. पॉवरसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W क्विक चार्जला सपोर्ट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Realmeच्या 2 फोनच्या किंमतीत मोठी कपात! ऑफर पाहून झटपट होताय ऑर्डर
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल