TRENDING:

जो विचार कराल ते होईल टाइप? Meta ची नवी Brain-Typing AI टेक्नॉलॉजी नेमकी काय? घ्या जाणून

Last Updated:
Brain-Typing AI: या डिजिटल जगात, लोक नवीन तंत्रज्ञानाने वेढलेले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला जे वाटते ते आपोआप टाइप व्हावे?
advertisement
1/7
जो विचार कराल ते होईल टाइप? Meta ची नवी Brain-Typing AI टेक्नॉलॉजी नेमकी काय?
Brain-Typing AI: या डिजिटल जगात, लोक नवीन तंत्रज्ञानाने वेढलेले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला जे वाटते ते आपोआप टाइप होते? हो, खरंतर 2017 मध्ये Facebookने एक अनोखी कल्पना मांडली होती.
advertisement
2/7
कंपनीच्या मते, फक्त विचार करून टाइप करता येईल अशी मेंदू वाचण्याची प्रणाली असावी. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, कंपनीने या दिशेने प्रगती केली आहे. मात्र, हे तंत्रज्ञान अद्याप सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही.
advertisement
3/7
Metaचे ब्रेन-टाइपिंग AI कसे काम करते : मेटाचे तंत्रज्ञान मेंदूच्या अॅक्टिव्हिटीजचे विश्लेषण करण्यासाठी आणि एखादी व्यक्ती कोणते अक्षर टाइप करत आहे याचा अंदाज लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि न्यूरोसायन्सचा वापर करते. पण यामध्येही एक समस्या आहे. खरं तर, ही संपूर्ण व्यवस्था एका मोठ्या आणि महागड्या उपकरणावर अवलंबून आहे. तसेच, ते फक्त कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट रूममध्येच वापरले जाऊ शकते.
advertisement
4/7
MIT Technology Review नुसार, ही टेक्नॉलॉजी मॅग्नेटोएन्सेफॅलोग्राफी (एमईजी) मशीन वापरते. जे मेंदूच्या अगदी लहान हालचाली देखील मॅग्नेटिक सिग्नलद्वारे मशीनकडे पाठवते. हे यंत्र खूप संवेदनशील आहे.
advertisement
5/7
सामान्य लोकांसाठी अद्याप उपलब्ध नाही : हे तंत्रज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक मोठी उपलब्धी असली तरी, ते प्रोडक्ट बनण्यास अजूनही बराच वेळ लागेल. यामागे अनेक कारणे आहेत.
advertisement
6/7
एमईजी मशीनचे वजन अर्धा टन आहे आणि त्याची किंमत सुमारे $2 मिलियन (16 कोटी रुपये) आहे. म्हणूनच हे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देता येत नाही. याशिवाय, या मशीनचा वापर करण्यासाठी, व्यक्तीला पूर्णपणे स्थिर बसावे लागते कारण थोडीशी हालचाल देखील मेंदूतील संदेश चुकीचे ठरवू शकते.
advertisement
7/7
मेटा संशोधक जीन-रेमी किंग आणि त्यांची टीम या तंत्रज्ञानाचा प्रोडक्टच्या रुपात विकास करण्याऐवजी मेंदूतील भाषेच्या प्रोसेसला चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
जो विचार कराल ते होईल टाइप? Meta ची नवी Brain-Typing AI टेक्नॉलॉजी नेमकी काय? घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल