TRENDING:

सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मली अभिनेत्री, एक चुकीचा निर्णय अन् सगळं उद्ध्वस्त झालं, सख्ख्या मुलानेच केला घात

Last Updated:
Actress Tragic Life: एकेकाळी धनसंपत्ती, नोकर-चाकर आणि चार भावांची लाडकी बहीण म्हणून लाडात जगणाऱ्या अभिनेत्रीला एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात मोठा धक्का सहन करावा लागला.
advertisement
1/6
सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मली अभिनेत्री, एक चुकीचा निर्णय अन् सगळं बरबाद झालं
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमा सुधा ऊर्फ सुधा यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही. एका काळात धनसंपत्ती, नोकर-चाकर आणि चार भावांची लाडकी बहीण म्हणून लाडात जगणाऱ्या सुधा यांना त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात मोठा धक्का सहन करावा लागला. त्यांना त्यांच्या सख्या मुलाने आणि पतीनेच कठीण वेळी वनवास दिला.
advertisement
2/6
सुधा यांचा जन्म अत्यंत धनसमृद्ध घरात झाला. त्यांचे आयुष्य अतिशय ऐशो-आरामात झाला गेले. त्यांची एक हाक ऐकताच घरात दहा लोक हजर असायचे. पण आयुष्यात झालेल्या एका दुर्देवी घटनेने त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली.
advertisement
3/6
सुधा यांनी सांगितले की, त्या एखाद्या स्वप्नांसारखे आयुष्य जगत होत्या, पण अचानक त्यांचे वडील गंभीरपणे आजारी पडले. त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्या अवघ्या आठ वर्षांच्या असताना, वडिलांच्या उपचारासाठी कुटुंबाला त्यांची सर्व मालमत्ता विकावी लागली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आईचा तावीज देखील गहाण ठेवावा लागला होता.
advertisement
4/6
चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यावर पैसा आला, पण त्यासोबतच कठोर वास्तव समोर आले. त्या म्हणाल्या, "मी एकदा दिल्लीत एक हॉटेल उघडले होते. त्या नादात मी माझी सर्व जमापुंजी गमावली. माझ्या एका सहीमुळे मी माझे सर्वस्व गमावले."
advertisement
5/6
आर्थिक अडचणींसोबतच, सुधा यांना त्यांच्या खासगी आयुष्यातही मोठे धक्के सहन करावे लागले. सुधा यांना एक मुलगा आहे, पण एका वादानंतर त्यांचे आणि मुलाचे नाते तणावपूर्ण झाले. त्यांचा मुलगा परदेशात गेला आणि तेव्हापासून त्याने सुधा यांच्याशी सर्व संपर्क तोडले. त्यांच्या पतीनेही या कठीण काळात त्यांची साथ सोडली.
advertisement
6/6
या सर्व अडचणी असूनही सुधा आजही तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसह अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी '७जी रेनबो कॉलनी' आणि अजितच्या 'वेदालम' सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मली अभिनेत्री, एक चुकीचा निर्णय अन् सगळं उद्ध्वस्त झालं, सख्ख्या मुलानेच केला घात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल