AC Tips: सिझन खरेदीपूर्वीच AC खरेदी करणं योग्य? जाणून घ्या 5 मोठे फायदे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्याच्या सिझनमध्ये पहिले नवीन एसी खरेदी करणे एक समजदारीचा निर्णय असू शकतो. आज आपण पाहूया की, सध्या नवीन एअर कंडीशनर घेणं का फायदेशीर ठरु शकतं.
advertisement
1/6

तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एसी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरु शकते. आज आपण जाणून घेऊया की, सीझन येण्यापूर्वी एसी खरेदी करणे एक स्मार्ट मूव्ह ठरु शकते. तुम्हीही विचार करत असाल की, उन्हाळ्यापूर्वी एसी खरेदीचा काय फायदा होणार आहे? तर आज आपण याच फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.आता एसी खरेदी करण्याचा फायदा काय?
advertisement
2/6
सर्वात पहिला फायदा : कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत. ज्यामुळे उपकरणांच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. अशावेळी तुम्ही आताच एसी खरेदी केली तर महागाईच्या फटक्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
advertisement
3/6
दुसरा फायदा: कंपन्या उन्हाळ्याच्या हंगामात नवीन मॉडेल्स सादर करण्यापूर्वी जुना स्टॉक काढून टाकतात जेणेकरून नवीन मॉडेल्ससाठी जागा मिळेल. म्हणूनच ते जुन्या आणि मागील वर्षाच्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देतात.
advertisement
4/6
तिसरा फायदा: हंगाम येण्यापूर्वी तुम्ही एअर कंडिशनरवर ऑफ-सीझन डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. सिझन येण्यापूर्वी सर्वत्र डिस्काउंट मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे सर्वोत्तम डील निवडून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.
advertisement
5/6
चौथा फायदा: उन्हाळ्याच्या आगमनाने, एसीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हंगामात किमती वाढू नयेत म्हणून, आत्ताच एसी खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय असू शकतो.
advertisement
6/6
पाचवा फायदा : उन्हाळ्याच्या सिझन दरम्यान जास्तीत जास्त लोकं एसी खरेदी करत असतो. त्यावेळी टाइम डिलिव्हरीमध्ये आणि इंस्टॉलेशनमध्ये उशीर लागू शकतो. मात्र एसी घेतल्यावर तुम्हाला क्विक डिलिव्हरी आणि इंस्टॉलेशनचा फायदाही मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
AC Tips: सिझन खरेदीपूर्वीच AC खरेदी करणं योग्य? जाणून घ्या 5 मोठे फायदे