आयफोन कॅमेराजवळ ब्लॅक डॉट का असतात? याचा वापर जाणून घेतल्यास व्हाल हैराण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही पाहिलं असेल की, आयफोन प्रो मॉडल्सच्या कॅमेरा मॉड्यूलवर एक ब्लॉक डॉट असतो. 2020 नंतर लॉन्च झालेल्या सर्व मॉडलवर हे डॉट आहेत. आज आपण जाणून घेऊया की, हे डॉट का असतात आणि याचं काम काय...
advertisement
1/5

आयफोन प्रोम मॉडल्सच्या कॅमेराजवळ एक ब्लॅक डॉट असतो या कडे कधी तुमचं लक्ष गेलं आहे का? आयफोन 17 प्रो मॉडल्सविषयी बोलायचं झाल्यास कॅमेरा मॉड्यूलमध्ये फ्लॅशलाइट खाली हे ब्लॅक डॉट असतं. तुम्ही कधी विचार केलाय का की, हे डॉट का असते आणि याचा काम काय आहे? आज आम्ही तुम्हाला या ब्लॅक डॉट आणि याच्या वापराविषयी सविस्तर सांगणार आहोत.
advertisement
2/5
ब्लॅक डॉटमध्ये एक सेन्सर असतो : आयफोन प्रो मॉड्यूलमधील हा काळा डॉट एक LiDAR (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) सेन्सर आहे. तो आयफोनला त्याच्या सभोवतालचे वातावरण शोधण्यास, फोटोची क्वालिटी सुधारण्यास, ऑगमेंटेड रिअॅलिटी अॅप्स चालवण्यास आणि ऑब्जेक्ट मेजर करण्यास मदत करतो. तो लोकांची उपस्थिती देखील ओळखू शकतो, दृष्टिहीनांसाठी अॅक्सेसिबिलिटी फीचर म्हणून काम करतो.
advertisement
3/5
हा सेन्सर सर्व आयफोनमध्ये नाही. अॅपलने 2020 मध्ये आयफोन 12 प्रो सोबत तो सादर केला आणि तेव्हापासून तो सतत अपग्रेड करत आहे. हा सेन्सर बॅकग्राउंडमध्ये काम करतो आणि तुम्ही तो मॅन्युअली चालू किंवा बंद करू शकत नाही.
advertisement
4/5
हे सेन्सर कसे काम करते? : या सेन्सरमध्ये एक प्रकाश उत्सर्जक आणि एक रिसीव्हर असतो. उत्सर्जकातून येणारा प्रकाश वस्तूकडे जातो आणि परत रिसीव्हरकडे परावर्तित होतो. हे अल्गोरिथमला कॅमेरा आणि वस्तूमधील अंतर निश्चित करण्यास अनुमती देते.
advertisement
5/5
कमी प्रकाशाच्या परिस्थितीत फोटो काढण्यासाठी आणि एआर अॅप्स वापरण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. सेन्सरवरील काळा ठिपका हा एक संरक्षक थर आहे जो व्हिजिबल लाइट शोषून घेतो परंतु जवळ-अवरक्त प्रकाश त्यातून जाऊ देतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
आयफोन कॅमेराजवळ ब्लॅक डॉट का असतात? याचा वापर जाणून घेतल्यास व्हाल हैराण