TRENDING:

80 वर्षांच्या आजोबांना हवीये 50 वर्षे लहान बायको! 30 वर्षांच्या तरुणीच्या शोधात, आहे खास कारण

Last Updated:
Old Age Man Want Young Wife : वयाच्या 79 व्या वर्षात 30-40 वर्षांची बायको शोधणारे आजोबा चर्चेत आले आहेत. त्यांनी तिला पगार देऊ केला आहे आणि काही अटही ठेवल्या आहेत.
advertisement
1/7
80 वर्षीय आजोबांना हवीये 50 वर्षे लहान बायको! 30वर्षीय तरुणीच्या शोधात, खास कारण
वय वर्षे 80 म्हणजे या वयात नातवंडंही लग्नाला झालेली असतात. असं असताना 79 वर्षांचे आजोबा जे 80च्या उंबरठ्यावरच आहेत, ते स्वतःसाठी नवरी शोधत आहेत.
advertisement
2/7
आपली होणारी बायको 30-40 वर्षांची असावी अशी त्यांची अट आहे. त्यांनी तिला 5.2 लाख डॉलर म्हणजे तब्बल साडेचार कोटी रुपये वार्षिक पगार देऊ केला आहे. तसंच तिच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सुविधा असेल.
advertisement
3/7
बेन्जामिन स्लॅड असं या व्यक्तीचं नाव. त्यांनी पत्नीसाठी जाहिरात दिली. अगदी पत्नीची नोकरीची ऑफरच त्यांनी देऊ केली आहे.
advertisement
4/7
या वयात तरुण बायको शोधण्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मालमत्तेसाठी वारस हवा आहे. बेन्जामिन यूकेमधील सोमरसेट इथं असलेली 1300 एकरच्या विशाल मोन्सल हाऊस राजघराण्याचे वारस आहेत. त्यांच्या मालमत्तेमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील 1292 वर्षांपूर्वीचे किल्ले, ट्री हाऊस 1000 एकरांचं जंगल आणि विविध संरक्षित क्षेत्रे आहेत.
advertisement
5/7
2021 मध्ये आयव्हीएफद्वारे त्यांना मुलगी झाली.  पण ब्रिटिश कायद्यानुसार बॅरीनेट पदवी फक्त पुरुष वारसांनाच मिळते. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांना मुलगा हवा आहे. ब्रिटनमधील श्रीमंत कुटुंबांमध्ये स्वतःचा वारसा जपण्यासाठी आणि वंश पुढे चालू ठेवण्याची जुनी परंपरा आहे. त्याचप्रमाणे अब्जाधीश सर बेंजामिन स्लेड यांनी संततीसाठी ही अनोखी पद्धत शोधून काढली आहे.
advertisement
6/7
बेंजामिन स्लेड यांनी 2008 साली पहिल्यांदा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती की, पत्नी म्हणून काम करण्यासाठी एक तरुण महिला हवी आहे. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजनसाठी एक डेटा प्रोफाइल तयार केलं. या असंख्य प्रयत्नांनंतर त्यांना अद्याप त्यांचा जोडीदार सापडलेला नाही.
advertisement
7/7
बेन्जामिन यांनी 1991 साली पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या मांजरी. त्यांच्याकडे 27 मांजरी होत्या. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
80 वर्षांच्या आजोबांना हवीये 50 वर्षे लहान बायको! 30 वर्षांच्या तरुणीच्या शोधात, आहे खास कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल