TRENDING:

रात्री येतो रडण्याचा आवाज, सकाळी भिंतीवर दिसतात खुणा...आजवर उलगडलं नाही कोडं PHOTOS

Last Updated:
आजूबाजूला भूत आहे, असे भास अनेकजणांना झाले असतील. परंतु नेमका 'हाच' भूत आहे, असं ठोस सांगण्यासारखा भूत आजवर कोणी पाहिलेला नसेल. त्यामुळे भूत खरोखर असतो का, याचं उत्तर आपल्याला माहित नाही. मात्र तरीही त्याच्या नुसत्या नावानेच आपली बोबडी वळते. कधीकधी आपण इंटरनेटवर 'The most haunted places?' असं सर्च करतो. तुम्हालाही भुतांबाबत फार कुतूहल वाटत असेल. तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
advertisement
1/5
रात्री येतो रडण्याचा आवाज, सकाळी भिंतीवर दिसतात खुणा...PHOTOS
अनेकजण फिरायला डोंगराळ भागात जातात. अनेकजणांना ऍडव्हेंचर आवडतं म्हणून ते ट्रेकिंगला जातात. काहीजण भरसमुद्राच्या मधोमध जहाजातून उडी घेतात. असे वेगवेगळे ऍडव्हेंचर लोकांना आवडतात. तर, काहीजण हॉन्टेड जागी फिरायला जाणं पसंत करतात.
advertisement
2/5
भारतात अशी अनेक हॉन्टेड ठिकाणं आहेत, जिथं पर्यटक भेट देतात. राजस्थानचं कुलधरा गाव आणि भानगढ किल्ला याबाबतीत प्रचंड प्रसिद्ध आहे. इथं अशा भयानक कथा ऐकायला मिळतात की, त्या नुसत्या ऐकूनच पर्यटकांना थरकाप भरतो.
advertisement
3/5
बिहारच्या जमुई जिल्ह्यातलं जुनं भवन हॉन्टेड ठिकाणदेखील भुतांसाठी प्रसिद्ध आहे. इंटरनेटवर या जागेचा अनेकजण शोध घेतात. शिवाय इथं भूत पाहायला पर्यटकदेखील दाखल होतात.
advertisement
4/5
जमुई जिल्ह्यात अनेक हॉन्टेड ठिकाणं आहेत. त्यातलं दुलारी भवन अक्षरशः खतरनाक आहे. त्याबद्दल परिसरातही विविध विचित्र कथा प्रचलित आहेत. ज्यामुळे तिथले नागरिक संध्याकाळ होताच दारं-खिडक्या बंद करून घेतात आणि घराबाहेर पडायला घाबरतात.
advertisement
5/5
दुलारी भवन वर्षानुवर्षे बंद आहे. ते उघडण्याची कोणी हिंमतही करत नाही. मात्र या भवनाच्या भिंतीवर उलट्या हाता-पायांच्या खुणा दिसतात. स्थानिक लोक सांगतात की, या खुणा रक्ताच्या आहेत. शिवाय अनेकजणांना याठिकाणी संध्याकाळच्या सुमारास किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात. त्यामुळे घराबाहेर पडण्याची रिस्क कोणी घेतच नाही. परंतु आपण फार धाडसी असाल, तर दुलारी भवनाला भेट देऊ शकता. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी इथं जाण्याचा अनुभव फार रोमांचक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
रात्री येतो रडण्याचा आवाज, सकाळी भिंतीवर दिसतात खुणा...आजवर उलगडलं नाही कोडं PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल