बाबो! टोमॅटोमुळे शेतकरी करोडपती झाला; आनंदात एकाच वेळी बुक केल्या 7 क्रेटा गाड्या
- Published by:Priya Lad
Last Updated:
टोमॅटोला चांगला भाव आल्याने एकाच गावातील सर्व शेतकऱ्यांचं नशीब पालटलं आहे.
advertisement
1/5

टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका ग्राहकांना बसतो आहे. पण यामुळे टोमॅटो उत्पादकांचं मात्र नशीब फळफळलं आहे. बऱ्याच वर्षांनी टोमॅटोला चांगला भाव मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. शेतकरी करोडपती झाले आहेत.
advertisement
2/5
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील म्हसोबा खाप या गावात दरवर्षी टोमॅटोचे उत्पन्न घेतले जाते मात्र यावर्षी शेतकऱ्याच्या टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यामुळे गावातील शेतकरी करोडपती झाले आहेत.
advertisement
3/5
या गावात साधारण साडेचार हजार लोकसंख्या असून 700 ते 800 कुटुंबाने टोमॅटोची लागवड केली होती. वीस ते पंचवीस शेतकरी करोडपती झाले आहेत.
advertisement
4/5
टोमॅटोच्या उत्पन्नामधून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या शेतकऱ्यांनी क्रेटा गाडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या दारात आता क्रेटा गाड्या दिसणार आहेत.
advertisement
5/5
या गाड्या जर एकत्र बुक केल्या तर शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे या गावातील सरपंच प्रकाश गाजरे यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून एकाच ठिकाणी गाड्या बुक करण्याचा निर्णय घेतला आहे, बाजारात गाड्या उपलब्ध नसल्यामुळे सुरुवातीला सात शेतकऱ्यांनी क्रेटा गाड्या बुक केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बाबो! टोमॅटोमुळे शेतकरी करोडपती झाला; आनंदात एकाच वेळी बुक केल्या 7 क्रेटा गाड्या