Space Science : अंतराळात माणसाआधी गेलेले प्राणी कोणते? काहींच्या कथा आजही अंगावर शहारे आणतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला अंतराळात कोणकोणते प्राणी गेले ते माहित आहेत का? चला त्यांची नावं आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ
advertisement
1/10

जेव्हा आपण अंतराळयात्रेची कल्पना करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नील आर्मस्ट्रॉन्ग किंवा युरी गागरिन यांचं चित्र उभं राहतं. पण तुम्हाला हे माहित आहे का की माणसाच्या आधी काही प्राणी अंतराळयात्रेसाठी गेले होते. हे प्रयोग केवळ माणसाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी होते. सुरुवातीला वैज्ञानिकांना हे जाणून घ्यायचं होतं की अंतराळातील वातावरण जीवांसाठी किती सुरक्षित आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वात आधी प्राण्यांना तिथे पाठवलं.
advertisement
2/10
पण तुम्हाला अंतराळात कोणकोणते प्राणी गेले ते माहित आहेत का? चला त्यांची नावं आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ.
advertisement
3/10
लाइका (कुत्रा): पहिला अंतराळ शहीद 1957 मध्ये सोव्हिएत रशियाने स्पुतनिक-2 या यानातून 'लाइका' नावाच्या भटक्या कुत्रीला पृथ्वीच्या कक्षेत पाठवलं. ती कक्षा गाठणारी पहिली सजीव होती. पण असं असलं तरी ती परत येऊ शकली नाही, पण तिचा बळी माणसासाठी अंतराळाचा मार्ग खुला करणारा ठरला.
advertisement
4/10
अल्बर्ट II (माकड): सबऑर्बिटल प्रवास करणारा पहिला प्राणी 1949 मध्ये अमेरिकेने 'अल्बर्ट II' या रीसस माकडाला 134 किमी उंचीवर पाठवलं. हे अंतराळात पोहोचलेलं पहिलं माकड होतं. परतीच्या वेळी पॅराशूट फेल झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, पण त्याचं मिशन अत्यंत मौल्यवान माहिती देऊन गेलं.
advertisement
5/10
फेलिसेट (मांजर): अंतराळात जाणारी पहिली मांजर 1963 मध्ये फ्रान्सने न्यूरोलॉजिकल रिसर्चसाठी 'फेलिसेट' नावाच्या मांजरीला अंतराळात पाठवलं. ती अंतराळातून सुरक्षित परतली आणि संशोधनाचा महत्त्वाचा भाग बनली. तिला आज "Astrocat" म्हणूनही ओळखतात.
advertisement
6/10
कासव: चंद्राच्या कक्षेत पोहोचलेला पहिला प्राणी 1968 मध्ये सोव्हिएत युनियनच्या Zond 5 मिशनमध्ये कासवांना चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात आलं. त्यांनी यशस्वीरीत्या चंद्राच्या आजूबाजूला परिक्रमा केली आणि पृथ्वीवर सुखरूप परतले.
advertisement
7/10
नेमाटोड कृमी: गुरुत्वाकर्षणाशिवाय जीवन कसं असतं? नेमाटोड कृमी अंतराळात पाठवण्यामागचं कारण होतं. गुरुत्वशून्यतेत त्यांचं वर्तन आणि हालचाल कशी बदलते, हे समजून घेणं. या प्रयोगांनी सूक्ष्मजीवांचं अनुकूलन कसं होतं यावर प्रकाश टाकला.
advertisement
8/10
अना आणि एबिगेल (कोळी): जाळं विणणं कसं शक्य? 1973 मध्ये Skylab 3 मिशनमध्ये दोन कोळ्यांना पाठवण्यात आलं. सुरुवातीला त्यांना अडचणी आल्या, पण नंतर त्यांनी अचूक गोल आणि संतुलित जाळं तयार केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जीवन कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतं.
advertisement
9/10
उंदीर : मानवाच्या शरीराशी जुळणारी प्रणाली उंदीर वारंवार अंतराळ प्रयोगांसाठी वापरण्यात आले. त्यांचं डीएनए मानवाशी खूप जुळतं. माईक्रोग्रॅव्हिटीमध्ये हाडांची घनता, स्नायूंची ताकद, आणि रोगप्रतिकारक शक्ती यावर होणारे परिणाम अभ्यासले गेले.
advertisement
10/10
आज माणूस अंतराळात सुरक्षित पोहोचत आणि पृथ्वीवर परतत आहे, पण यासाठी अनेक निरपराध प्राण्यांच्या साहसाची आणि बलिदानाची सावली आहे. ज्यांनी माणसाच्या अंतराळ प्रवासाचा पाया रचला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Space Science : अंतराळात माणसाआधी गेलेले प्राणी कोणते? काहींच्या कथा आजही अंगावर शहारे आणतात