Baba Vanga : खरी होतीये बाबा वेंगा यांची भविष्यवाणी; मग 6 महिन्यात खरंच सुरू होणार जगाचा विनाश?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
बाबा वेंगा यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल. ज्या प्रकारे त्यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरत गेल्या, त्याने लोकांना आश्चर्यचकित केलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण देखील दिलं. पुढील भविष्याबद्दलही त्यांनी अनेक अंदाज वर्तवले आहेत
advertisement
1/7

बाबा वेंगा यांचं 28 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांच्या मृत्यूपूर्वीच, त्यांने युक्रेनमधील चेरनोबिल आपत्ती, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, न्यूयॉर्कमधील 9/11चा हल्ला आणि स्वतःच्या मृत्यूबद्दल अगदी अचूक भाकीत केलं होतं.
advertisement
2/7
बाबा वेंगा यांनी २०२४ सालाबद्दल जे काही सांगितलं होतं ते खरं ठरताना दिसत आहे. या वर्षी युद्धाच्या घटना वाढतील, असं ते म्हणाले होते. रशिया-युक्रेन आणि नंतर इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपूर्ण जगाने पाहिला.
advertisement
3/7
याशिवाय एलियन्सशी चकमक होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं होतं. याची पुष्टी झालेली नाही पण अनेक ठिकाणी यूएफओ सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
4/7
याशिवाय त्यांचे महत्त्वाचे भाकीत ग्लोबल वॉर्मिंगबाबत होते. हवामान भयानक असेल असे त्यांनी सांगितले होते. भयंकर उष्णतेमुळे लोकांना त्रास होईल आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यांचा अंदाज बऱ्याच प्रमाणात खरा ठरला आणि संपूर्ण जगाने उष्णतेच्या लाटा पाहिल्या.
advertisement
5/7
ते पुन्हा पुराबद्दल बोलले, तेही होताना दिसत आहे. याशिवाय 2033 पर्यंत ध्रुवीय बर्फ वितळण्यास सुरुवात होईल आणि जगातील समुद्राची पातळी खूप वाढेल असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे काही शहरांचे अस्तित्वही संपुष्टात येऊ शकते.
advertisement
6/7
त्यांनी सांगितलेली सर्वात भयानक गोष्ट म्हणजे 2025 सालापासून अधोगती आणि विनाशाची प्रक्रिया सुरू होईल. या वर्षी विश्वात अशी घटना घडणार आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एवढंच नाही तर युरोपमध्ये असं काहीतरी घडेल ज्यामुळे त्यांची लोकसंख्या कमालीची कमी होईल. अशा प्रकारे, पुढील 6 महिन्यांनंतर आपण हळूहळू अधोगतीकडे वाटचाल सुरू करू.
advertisement
7/7
हे देखील मनोरंजक आहे, की बाबा वेंगा यांनी दावा केला होता की 2028 पर्यंत मानव शुक्रावर जाईल. मात्र, सध्या या दिशेने विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. 2130 पर्यंत एलियन्सशी संपर्क प्रस्थापित होईल, असेही त्यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2170 मध्ये मोठा दुष्काळ पडेल आणि त्यामुळे 3797 मध्ये पृथ्वी नष्ट होईल. तोपर्यंत अनेक मानव इतर ग्रहांवर पोहोचले असतील, असंही ते म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Baba Vanga : खरी होतीये बाबा वेंगा यांची भविष्यवाणी; मग 6 महिन्यात खरंच सुरू होणार जगाचा विनाश?