अंड्यात लाल रक्ताचा डाग दिसला तर ते खावं की फेकून द्यावं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी अंडं फोडताना त्याच्या पिवळ्या भागावर लालसर किंवा रक्तासारखा डाग पाहिला आहे का? असा डाग दिसल्यावर बरेच लोक गोंधळतात हे अंडं खावं का फेकून द्यावं?
advertisement
1/8

अंडं हे अनेकांच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. नाश्त्याला ऑमलेट, बुर्जी, सॅन्डविच किंवा उकडलेलं अंडं यापैकी काहीतरी तरी असतंच. असे अनेक लोक आहेत जे मांस किंवा मासे खात नाहीत, पण ते अंड खातात. कारण त्यामुळे प्रोटीन मिळतं.
advertisement
2/8
पण तुम्ही कधी अंडं फोडताना त्याच्या पिवळ्या भागावर लालसर किंवा रक्तासारखा डाग पाहिला आहे का? असा डाग दिसल्यावर बरेच लोक गोंधळतात हे अंडं खावं का फेकून द्यावं?
advertisement
3/8
अनेक जण हा रक्ताचा डाग असलेला भाग काढून उरलेलं अंडं शिजवून खातात, तर काहीजण पूर्ण अंडंच फेकून देतात. मग अशावेळी करायचं काय? योग्य पर्याय काय? तज्ज्ञ सांगतात की, अशा अंड्यामुळे शरीराला काहीही हानी होत नाही फक्त ते अंडं नीट शिजवलेलं असणं आवश्यक आहे.
advertisement
4/8
रक्ताचा डाग का दिसतो?अंडं तयार होत असताना ते फॅलोपियन ट्यूबमधून जातं. त्या प्रक्रियेदरम्यान अंड्यात कधी कधी लहान रक्ताचे किंवा मांसाचे कण अडकतात. हे पूर्णतः नैसर्गिक आहे आणि त्यामध्ये कोणतेही हानिकारक जीवाणू नसतात. म्हणूनच जर अंडं नीट फ्राय, बुर्जी किंवा उकडलेलं असेल, तर ते निश्चिंतपणे खाऊ शकता.
advertisement
5/8
कोणतं अंडं टाळावं?जर अंड्याचा पांढरा भाग गुलाबी, लालसर किंवा हिरवट रंगाचा दिसत असेल, तर मात्र ते अंडं अजिबात खाऊ नका.असं अंडं म्हणजे त्यामध्ये विषारी जीवाणूंची वाढ झालेली असते, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अशा अंड्यांना लगेच फेकून देणं योग्य.
advertisement
6/8
बाजारात अशी अंडी येतात कशी?अंडी बाजारात येण्यापूर्वी त्यांची “कॅन्डलिंग” पद्धतीने तपासणी केली जाते. या पद्धतीत अंड्यातून तीव्र प्रकाश सोडला जातो आणि आत रक्ताचे डाग आहेत का हे तपासलं जातं. रक्ताचे डाग असलेली अंडी साधारणपणे बाजूला काढली जातात. त्यामुळे अशा अंड्यांचा तुमच्या हातात येण्याचा संभव फारच कमी असतो.
advertisement
7/8
तज्ज्ञांच्या मते, तपकिरी कवच असलेल्या अंड्यांमध्ये रक्ताचे डाग दिसण्याची शक्यता थोडी जास्त असते. कारण त्यांचा गडद रंग अनेकदा हे डाग झाकतो, त्यामुळे चाचणीदरम्यान ते दिसून येत नाहीत.
advertisement
8/8
रक्ताचा डाग असलेलं अंडं दिसलं तरी घाबरू नका. ते योग्य प्रकारे शिजवलं असेल तर खाण्यास सुरक्षित असतं.पण अंड्याचा रंग, वास किंवा पांढऱ्या भागाचा वेगळा रंग दिसला, तर ते त्वरित फेकून द्यावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अंड्यात लाल रक्ताचा डाग दिसला तर ते खावं की फेकून द्यावं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात