TRENDING:

अगं अगं म्हशी! टरफलं समजून मालकाचं अडीच तोळं सोनंच फस्त केलं; पुढे घडलं असं की...

Last Updated:
शेतकऱ्याने ज्या म्हशीला पाळलं तिनं आपल्या मालकाचं तब्बल दोन लाख रुपयांचं सोनं खाल्ल्याचं प्रकरण चर्चेत आलं आहे.
advertisement
1/5
अगं अगं म्हशी! टरफलं समजून मालकाचं अडीच तोळं सोनं फस्त केलं; पुढे घडलं असं की...
वाशिम जिल्ह्यातील सार्सी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने त्याचं चक्क अडीच तोळे सोनंच फस्त केलं आहे. तब्बल दोन लाख रुपयांचं सोनं म्हशीच्या पोटात गेलं.
advertisement
2/5
रामहरी भोयर असं या शेतकऱ्याचं नाव. शेतीसह त्यानं गुरंही पाळली आहे. त्याची पत्नी गीताबाई भोयर या गुरांना खायला द्यायला म्हणून सोयाबीन शेंगाची टरफलं ताटात काढली. त्याच ताटात तिनं आपल्या गळ्याती दोन तोळं सोन्याची पोथही काढून ठेवली.
advertisement
3/5
दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं म्हशी समोर खाण्यासाठी ही टरफलं ठेवली. त्यानंतर त्यांना आपल्या गळ्यातील पोथ नसल्याचं समजलं. तिनं ती सगळीकडे शोधली पण सापडली नाही. टरफलासोबत म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली असावी असा संशय तिला आला. तिने आपल्या पतीला याबाबत सांगितलं.
advertisement
4/5
म्हशीला पशू वैद्यकीय दवाखान्यात नेण्यात नेलं. तिथं मेटल डिटेक्शन करून तिच्या पोटात सोन्याची पोथ आहे याची खात्री केली. ती शेणातून बाहेर पडेल यासाठी एक दिवस वाट पाहिली. पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी म्हशीची शस्त्रक्रिया करून म्हशीच्या तिचा पोटातील पोथ काढण्यात आली.
advertisement
5/5
सोन्याची पोथ पोटातून काढल्यानंतरम्हशीची तब्येत व्यवस्थित असून ती नीट चारा खात आहे. जनावरांना चारा टाकताना काळजी घेण्याचं आवाहन गुरांच्या डॉक्टरांनी केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अगं अगं म्हशी! टरफलं समजून मालकाचं अडीच तोळं सोनंच फस्त केलं; पुढे घडलं असं की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल