TRENDING:

Akshaya Tritiya Chanakya Niti - अक्षय्य तृतीयेला बायकोला सोनं नाही दिलंत तरी चालेल पण 'हे' गिफ्ट द्या; खूश झालीच समजा

Last Updated:
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण सोनं इतकं महाग झालं आहे की ते सर्वांनाच परवडणारं नाही. पण अक्षय्य तृतीया सोन्याशिवाय बायकोला तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असेल. तर अशा काही गोष्टी चाणक्यनीतीत सांगिल्यात ज्या दिल्या तर ती खूश होईल.
advertisement
1/5
अक्षय्य तृतीयेला बायकोला सोनं नाही दिलंत तरी चालेल पण 'हे' गिफ्ट द्या; होईल खूश
पत्नीला खूश, आनंदी, समाधानी कसं ठेवायचं हा पतीसमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न. यासाठी काही पुरुष काय काय नाही करत. पण आचार्य चाणक्य यांनी <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये पत्नीला आनंदी ठेण्याचे उपाय दिले आहेत. पुरुषाची कोणती क्षमता स्त्रीला संतुष्ट करते हे चाणक्य यांनी सांगितलं आहे.
advertisement
2/5
जबाबदार - चाणक्य नीतीमध्ये असं म्हटले आहे की पुरुषांनी नेहमी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. असे पुरुष त्यांच्या पत्नीला प्रिय असतात. पत्नीला शारीरिक आणि मानसिकरित्या समाधानी ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.
advertisement
3/5
सतर्कता - पतीने सदैव सतर्क राहावं. किंचितही हालचाल झाली तरी झोपेतही जाग यायला हवी. थोड्याशा हालचालीनेही जाग येऊन विचारपूस करणारे पुरुष महिलांना आवडतात.
advertisement
4/5
निष्ठा - पुरुषांनीही त्यांच्या पत्नीशी एकनिष्ठ असले पाहिजे. जे पुरुष कोणत्याही अनोळखी स्त्रीला पाहून डगमगत नाहीत, असे पुरुष महिलांना आवडतात. एकनिष्ठ पतीवर पत्नी खूप प्रेम करते.
advertisement
5/5
शौर्य - महिलांना वीर पुरुष खूप आवडतात. त्यामुळे पुरुषांनी कोणत्याही परिस्थितीत आपली पत्नी, मुलं आणि कुटुंबाची रक्षा करावी. वीर पुरुषाच्या पत्नीला नेहमी आपल्या पतीचा अभिमान वाटतो. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Akshaya Tritiya Chanakya Niti - अक्षय्य तृतीयेला बायकोला सोनं नाही दिलंत तरी चालेल पण 'हे' गिफ्ट द्या; खूश झालीच समजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल