Chanakya Niti : कितीही दिलं तरी मन भरत नाही, या 4 गोष्टींसाठी वेडे असतात पुरुष
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीत अशा 4 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही माणसाला थकवत नाहीत. कितीही मिळालं तरी ते नेहमीच कमी वाटतं. लोक वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतात.
advertisement
1/5

चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. चाणक्य यांनी त्यांच्या एका धोरणात अशा 4 गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्हाला कितीही मिळाले तरी ते नेहमीच कमी वाटतात.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणूस वेड्यासारखा पैशाच्या मागे धावतो. त्याला कितीही पैसे मिळाले तरी त्याचा लोभ कमी होत नाही. हेच पैसे माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. पैशाच्या लोभापायी बरेच लोक उद्ध्वस्त होतात पण त्यांची पैसे मिळवण्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही.
advertisement
3/5
स्त्रीसुखासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असलेले बरेच लोक आहेत. त्याच्या या प्रवृत्तीमुळे लोकांच्या नजरेत त्यांची किंमत कमी होते पण त्यानंतरही त्यांचं स्त्रियांबद्दलचे प्रेम कमी होत नाही. असे लोक स्त्रीच्या आनंदासाठी कोणालाही हानी पोहोचवण्यास तयार असतात.
advertisement
4/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्वादिष्ट अन्न पोट भरतं पण मनाला समाधान देत नाही. असं अन्न आरोग्यासाठी कितीही धोकादायक असलं तरी माणूस त्याच्या चवीसाठी प्रत्येक धोका पत्करण्यास तयार असतो. म्हणूनच माणूस कधीही स्वादिष्ट अन्नाने तृप्त होत नाही.
advertisement
5/5
मृत्यू हे सर्वात मोठे सत्य आहे हे सर्वांना माहित आहे. आयुष्यात कितीही दुःख आलं तरी प्रत्येक व्यक्तीला शक्य तितकं जास्त काळ जगायचं असतं. म्हणूनच चाणक्य म्हणाले की आपल्याला कितीही आयुष्य मिळालं तरी ते नेहमीच लहान वाटतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : कितीही दिलं तरी मन भरत नाही, या 4 गोष्टींसाठी वेडे असतात पुरुष