Hurricane Milton: तब्बल 1.50 कोटी लोकांचा जीव धोक्यात, येतंय भयानक संकट, रेडअलर्ट जारी
- Published by:sachin Salve
Last Updated:
या राज्यांच्या किनारी शहरांमध्ये उंच लाटा, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता नाही.
advertisement
1/7

अमेरिकेला सध्या एका मोठ्या नैसर्गिक संकटाचा धोका आहे. अमेरिकन सरकारने फ्लोरिडामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. कारण, मेक्सिकोच्या आखातात निर्माण झालेलं मिल्टन चक्रीवादळ वेगाने फ्लोरिडाच्या दिशेने सरकत आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, मिल्टन सध्या मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आहे. रविवारी त्याचं कॅटेगरी वनमध्ये रूपांतर झालं आहे.
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, हे वादळ रविवारी टँपापासून सुमारे 780 मैल (1,255 किलोमीटर) दूर नैर्ऋत्य दिशेला होतं. वाऱ्यांचा जास्तीत जास्त वेग ताशी 85 मैल (140 किलोमीटर) होता. मिल्टन वादळ ताशी 7 मैल (11 किलोमीटर) वेगाने पूर्वेकडे फ्लोरिडाच्या दिशेने सरकत होतं. बुधवारी सकाळपर्यंत ते फ्लोरिडाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या शहरांसाठी घातक ठरू शकतं. फ्लोरिडाला पोहोचण्यापूर्वी त्याचं कॅटेगरी-थ्रीमध्ये रूपांतर होईल.
advertisement
3/7
मिल्टन चक्रीवादळामुळे सुमारे दीड कोटी नागरिकांच्या जिवाला धोका आहे. फ्लोरिडामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रात्री वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फ्लोरिडा आणि कीजमध्ये 5ते 8 इंच (127-203 मिमी) पाऊस पडू शकतो. काही भागांत 12 इंचांपर्यंत (304 मिमी) पाऊस पडू शकतो. पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत अचानक पूर येण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
काउंटीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संचालक कॅथी पर्किन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, काउंटीने आधीच सहा रुग्णालयं, 25 नर्सिंग होम्स आणि 44 सार्वजनिक रुग्णालयं रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये एकूण 6600 रुग्ण आहेत. सोमवार ते बुधवारपर्यंत विमानतळ आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
5/7
नॅशनल हरिकेन सेंटरच्या म्हणण्यानुसार, मिल्टन आग्नेय कॅरोलिना आणि ईशान्य कॅरोलिनासाठीदेखील धोकादायक ठरू शकतं. या राज्यांच्या किनारी शहरांमध्ये उंच लाटा, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता नाही; पण फ्लोरिडामध्ये लँडफॉल करण्यासाठी मिल्टनने मेक्सिकोच्या खाडीत ताकद गोळा केल्यामुळे उत्तर कॅरोलिनातल्या रहिवाशांना संकटाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
6/7
काही दिवसांपूर्वी आलेल्या हेलन चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. मिल्टन चक्रीवादळ बुधवारी टँपा उपसागरात उतरेल आणि मध्य फ्लोरिडा ओलांडून अटलांटिक महासागरात जाईल, अशी शक्यता आहे. मिल्टन हे गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेला धडकणारं दुसरं मोठं वादळ असेल. काही दिवसांपूर्वी हेलनने दक्षिण अमेरिकेत किमान 225 जणांचा बळी घेतला होता आणि 250 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
advertisement
7/7
गेल्या 6 महिन्यांत अटलांटिक महासागरात 13 वादळं आली आहेत. त्यापैकी चार वादळं अमेरिकेला धडकली आहेत. त्यात हेलन आणि बेरील यांचा समावेश आहे. या वादळांमुळे अमेरिकेतल्या चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर असलेल्या ह्यूस्टनमधला वीजपुरवठा खंडित झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hurricane Milton: तब्बल 1.50 कोटी लोकांचा जीव धोक्यात, येतंय भयानक संकट, रेडअलर्ट जारी