जालना: सध्याच्या काळात नगदी पैशाचा स्रोत म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढत आहे. दुग्धव्यवसाय करताना शेतकऱ्यांना चाऱ्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न भेडसावतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुग्ध व्यवसायिकांबरोबरच सामान्य शेतकरी देखील चाऱ्याची जुळवा जुळव करण्यात व्यस्त असतो. दुधाळ जनावरांचे दूध वाढवण्यासाठी पुरवणुकीचा चारा गरजेचा असतो. त्यासाठी मका, ज्वारी आदी पिके घेतली जातात. याच मक्यापासून किंवा ज्वारीपासून उत्कृष्ट दर्जांचा मुरघास आपण तयार करू शकतो. हिरव्या चाऱ्या इतकीच पोषणतत्वे असलेला हा मुरघास चारा नसेल तेव्हा आपल्याला वापरता येतो. हा मुरघास नेमका बनवयाचा कसा? याबाबत जालना येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कपिल पंडित यांनी माहिती दिलीय.