TRENDING:

Google ठप्प, YouTube चालेना; सर्वात मोठा Outage; भारतासह अमेरिकेत एकच गोंधळ उडाला

Last Updated:

Google Outage: भारत आणि अमेरिकेत यूट्यूब, गुगल सर्चसह गुगलच्या अनेक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. हजारो युझर्सनी व्हिडिओ लोड न होणे, सर्च संथ होणे आणि अ‍ॅप उघडत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/मुंबई: भारत आणि अमेरिकेतील अनेक युझर्सना यूट्यूब, गुगल सर्च आणि त्यासंबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामुळे ऑनलाइन माध्यमांवर आणि सोशल मीडियावरYouTube आणि Google बंद आहेत का?”, “सेवा पुन्हा कधी सुरू होतील?” अशा प्रश्नांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला जात आहे.

advertisement

हजारो युझर्सनी यूट्यूब व्हिडिओ लोड होण्यास प्रचंड वेळ लागत असल्याची, व्हिडिओ सतत बफर होत असल्याची किंवा पूर्णपणे प्ले न होण्याची तक्रार केली आहे. काही युझर्सनी यूट्यूबची वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅप उघडताच येत नसल्याचेही सांगितले आहे. या तक्रारी केवळ एखाद्या ठिकाणापुरत्या मर्यादित नसून, मोठ्या स्तरावर सेवा ठप्प झाल्याचे संकेत देत आहेत.

advertisement

आऊटेज ट्रॅक करणाऱ्या Downdetector या प्लॅटफॉर्मवरील आकडेवारीनुसार, तक्रारींमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला सुमारे 3,500 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, मात्र काही तासांतच हा आकडा 11,000 पेक्षा जास्त झाला. यामुळे ही अडचण मोठ्या प्रमाणावर पसरलेली असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या समस्येच्या कारणांबाबत किंवा सेवा पूर्ववत होण्याच्या वेळेबाबत गुगलकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

advertisement

नेमकी काय अडचण

युझर्सच्या म्हणण्यानुसार, यूट्यूबवरील व्हिडिओ असामान्यपणे संथ गतीने लोड होत आहेत, वारंवार बफर होत आहेत किंवा अजिबात प्ले होत नाहीत. काही जणांना यूट्यूबची वेबसाइट किंवा अ‍ॅप उघडण्यातही अडचण येत आहे. Downdetector च्या माहितीनुसार, सुमारे 73 टक्के युझर्सनी वेबसाइटशी संबंधित समस्या, 18 टक्क्यांनी व्हिडिओ स्ट्रीमिंग अडचणी, तर 9 टक्के युझर्सनी अ‍ॅपशी संबंधित त्रुटींची तक्रार केली आहे.

advertisement

कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक परिणाम 

या आऊटेजचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. भारतातून सुमारे 3,300 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी 53 टक्के युझर्सनी सर्व्हर कनेक्शन समस्या, 34 टक्क्यांनी वेबसाइट लोड होण्यातील अडचणी, तर 13 टक्क्यांनी व्हिडिओ स्ट्रीमिंगशी संबंधित समस्या असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेतही अनेक युझर्सनी अडचणींची तक्रार केली आहे. विशेषतः YouTube TV वापरणाऱ्या ग्राहकांनी लाईव्ह स्ट्रीम्स लोड न होण्याची समस्या असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय, Google Search सेवेतही व्यत्यय येत असल्याचे सांगण्यात आले असून, काही युझर्सना सर्च रिझल्ट उशिरा मिळत आहेत किंवा अजिबात मिळत नाहीत.

कोणत्या सेवा बाधित झाल्या 

यूट्यूब आणि गुगल सर्च व्यतिरिक्त, गुगलच्या इतर मुख्य सेवांमध्येही अडथळे येत असल्याचे युझर्सनी नोंदवले आहे. Downdetector च्या माहितीनुसार, तक्रारी YouTube, Google Search आणि YouTube TV या सर्व सेवांशी संबंधित आहेत, ज्यामुळे गुगलच्या संपूर्ण डिजिटल इकोसिस्टीमवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुगलकडून काय प्रतिक्रिया

सध्या तरी गुगलकडून या आऊटेजबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सेवा ठप्प होण्याचे नेमके कारण काय आहे, तसेच या अडचणी कधीपर्यंत दूर होतील, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता कायम आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google ठप्प, YouTube चालेना; सर्वात मोठा Outage; भारतासह अमेरिकेत एकच गोंधळ उडाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल