TRENDING:

IND vs SA : आफ्रिकेला लोळवलं, भारताची चिंता मिटली; टीम इंडियाला मिळाले वर्ल्डकप जिंकून देणारे 3 स्टार

Last Updated:
अहमदाबादमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेला 10 धावांनी हरवले. तिलक वर्मा 73, हार्दिक पांड्या 63, क्विंटन डिकॉक 65. भारताने टी20 मालिका 3-1 ने जिंकली.
advertisement
1/7
आफ्रिकेला लोळवलं, भारताची चिंता मिटली; टीम इंडियाला मिळाले वर्ल्डकप जिंकून देणार
अहमदाबादच्या मैदानावर पार पडलेल्या पाचव्या टी20 सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला आहे.तर भारताने हा सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात घातली आहे.
advertisement
2/7
भारताने दिलेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिका फक्त 201 च धावा करू शकली होती. त्यामुळे भारताने हा सामना 30 धावांनी जिंकला आहे. हा सामना जिंकून भारताचं टेन्शन मिटलं आहे. कारण या मालिकेमधून वर्ल्ड कप जिंकून देणारे तीन स्टार खेळाडू भारताला सापडले आहेत.
advertisement
3/7
या सामन्यात भारताने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 65 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.तर डेवाल्ड ब्रावीसने 31 धावांची खेळी केली होती. या व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता न आल्याने साऊथ आफ्रिका या सामन्यात हारली. भारताकडून वरून चक्रवर्तीने 4,बुमराहने 2 तर हार्दिक पांड्या आणि अर्शदिपने प्रत्येकी 1 विकेट काढली होती. वरूण चक्रवर्ती देखील वर्ल्ड कपमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकतो.
advertisement
4/7
भारताकडून तिलक वर्माने यावेळी 42 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान 1 षटकार आणि 10 चौकार मारले होते.
advertisement
5/7
त्याच्यासोबत हार्दिक पांड्याने 25 बॉलमध्ये 63 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले होते. अशाप्रकारे भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 231 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यातील हार्दिकची बॅटींग पाहून तो टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिला खेळाडू ठरू शकतो. त्याच्यासोबत संजूची बॅटींग पाहून तो देखील वर्ल्ड कपमध्ये मोठा खेळाडू ठरू शकतो.
advertisement
6/7
साऊथ आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने 2 विकेट तर ओटनिल बार्टमेन आणि जॉर्ज लिंडेने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
advertisement
7/7
दरम्यान हा सामना जिंकून भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने खिशात घातली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेला लोळवलं, भारताची चिंता मिटली; टीम इंडियाला मिळाले वर्ल्डकप जिंकून देणारे 3 स्टार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल