Best Selling Whisky : भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की कोणती? नाव ऐकून विश्वास बसणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काहींसाठी हे फक्त रिलॅक्स होण्याचं साधन आहे, तर काहींसाठी प्रतिष्ठेचं प्रतीक. पण कधी विचार केला आहे का, भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की कोणती आहे?
advertisement
1/8

कोणतीही पार्टी असोत किंवा मग खास गेट-टुगेदर भारतात अनेक लोक व्हिस्की किंवा आपल्या आवडती दारु पिऊन सेलिब्रेशन करतात. अनेकांसाठी तर व्हिस्की आणि दारूशिवाय कार्यक्रम अपूर्णच वाटतो.
advertisement
2/8
आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं माहीत असूनही लोकांचा यावरचा मोह कमी होत नाही. काहींसाठी हे फक्त रिलॅक्स होण्याचं साधन आहे, तर काहींसाठी प्रतिष्ठेचं प्रतीक. पण कधी विचार केला आहे का, भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की कोणती आहे?
advertisement
3/8
अलीकडील आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्की ब्रँडच्या यादीत Officer’s Choice, McDowell’s No.1 आणि Imperial Blue वरचढ आहेत. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड म्हणून Officer’s Choiceने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आपली जागा पक्की केली आहे.
advertisement
4/8
समोर आलेल्या Sales Figures नुसार2024 मध्ये McDowell’s No. 1 हे सर्वाधिक विकले जाणारे भारतीय व्हिस्की ब्रँड आहे. याचे जवळपास 32.2 दशलक्ष बॉटल्स विकले गेले आहेत.
advertisement
5/8
दुसऱ्या क्रमांकावर आहे Royal Stag (31M बॉटल्स) आणि Imperial Blue (22.9M बॉटल), तर Officer’s Choice चौथ्या स्थानावर 21.3M बॉटल्स विकले गेले आहे.
advertisement
6/8
दरवर्षी लाखो लिटर व्हिस्की विकली जाते आणि या ब्रँड्सचा मार्केट शेअर कोट्यवधी रुपयांचा आहे. तज्ज्ञ सांगतात की, स्वस्तात मिळणं, सहज उपलब्धता आणि ब्रँडची लोकप्रियता यामुळे ह्या ब्रँड्सना लोक सर्वाधिक पसंती देतात.
advertisement
7/8
पण एकीकडे या प्रचंड विक्रीच्या आकड्यांमागे आरोग्यावर होणारे परिणामही दुर्लक्षित करता येणार नाहीत. यकृताचे आजार, व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांची शिकार होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही, व्हिस्कीच्या ग्लासात लोकांना तात्पुरती मजा दिसते आणि ब्रँड्सची विक्री मात्र झपाट्याने वाढते.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Best Selling Whisky : भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की कोणती? नाव ऐकून विश्वास बसणार नाही