Do You Know : जगातील 'ही' एकमेव नदी 11 देशांचा करते प्रवास, सांगता येईल का तिचं नाव?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा प्रश्न भूगोलाशी संबंधित आहे, पण इतिहासातही त्याचं महत्त्व आहे. प्रश्न अगदी सोपा आहे, पण उत्तर बऱ्याच जणांना सांगता येणार नाही.
advertisement
1/8

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याबद्दलची खरी माहिती आपल्याला नसते. काही वेळा आपण शाळेत शिकलेले धडेही पुढे जाऊन विसरतो. पण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं असतं, कारण त्या आपल्या ज्ञानात भर घालतात आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतात.
advertisement
2/8
आज आपण अशाच एका रंजक आणि ज्ञानात भर पाडणाऱ्या प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रश्न भूगोलाशी संबंधित आहे, पण इतिहासातही त्याचं महत्त्व आहे. प्रश्न अगदी सोपा आहे, पण उत्तर बऱ्याच जणांना सांगता येणार नाही.
advertisement
3/8
जगातील सर्वात लांब आणि 11 देशांतून वाहणारी नदी कोणती?
advertisement
4/8
याचं उत्तर तुम्ही शाळेत असताचा नक्कीच वाचलं असणार. पण आता मात्र फार कमी लोक याचं उत्तर देऊ शकतील. पाहा मग तुम्हाला देता येतंय का?
advertisement
5/8
उत्तर देता आलं नाही तरी काळजी करु नका आम्ही ते जाणून घेण्यासाठी तुमची मदत करु.
advertisement
6/8
या प्रश्नाचं उत्तर आहे नाईल नदी (Nile River). ही नदी आफ्रिकेतील 11 देशांतून वाहते, त्यात इजिप्त, युगांडा, सुदान, दक्षिण सुदान, टांझानिया, र्वांडासह इतर देशांचा समावेश होतो. नाईल नदीची एकूण लांबी तब्बल 6,690 किलोमीटर इतकी आहे.
advertisement
7/8
नाईल नदीचं महत्त्व केवळ तिच्या लांबीपुरतं नाही, तर तिच्या सभोवतालच्या संस्कृतींशी, इतिहासाशी आणि लोकजीवनाशी जोडलेलं आहे. इजिप्तची प्राचीन संस्कृती, शेती आणि व्यापार या सगळ्याचं केंद्र ही नदी आहे. या नदीच्या किनाऱ्यावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आणि आदिवासी जमातींचं जीवनही तिच्याभोवतीच फिरतं.
advertisement
8/8
आजही नाईल नदी आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहे. तिचा वापर पाणी शेती, वीज निर्मिती आणि वाहतुकीसाठी देखील होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : जगातील 'ही' एकमेव नदी 11 देशांचा करते प्रवास, सांगता येईल का तिचं नाव?